Anita Bose Pfaff : सुभाष चंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस फाफ

Anita Bose Pfaff : अनिता बोस फाफ यांनी ’नेताजी सुभाषचंद्र बोस ऍंड जर्मनी’ (Netaji Subhash Chandra Bose and Germany) नावाचे इंग्रजीत पुस्तक लिहिले

237
Anita Bose Pfaff : सुभाष चंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस फाफ
Anita Bose Pfaff : सुभाष चंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस फाफ

अनिता बोस फाफ (Anita Bose Pfaff ) यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ मध्ये व्हिएन्ना येथे झाला. ऑस्ट्रियन महिला एमिली शँकेल ह्या त्यांच्या मातोश्री आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेते सुभाष चंद्र बोस (Subhash Chandra Bose) हे त्यांचे वडील. सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईनेच त्यांचा सांभाळ केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनिता यांनी प्रोफेसर मार्टिन फाफ यांच्याशी विवाह केला.

(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Rescue : ‘ते’ सर्व मजूर सुखरूप बाहेर; उत्तरकाशीत जल्लोष)

जर्मन सोशल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये कार्य

त्यांचे पती जर्मन संसदेच्या (German parliaments) बुंडेस्टॅगचे सदस्य होते आणि ते जर्मन सोशल डेमोक्रॅटिक पक्षाशी (German Social Democratic Party) संबंधित आहेत. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली अशी एकूण तीन मुले आहेत. मुलाचे नाव पीटर अरुण आणि मुलींचे नाव थॉमस कृष्णा आणि माया कॅरिना आहे. अनिता आपल्या पतीसोबत जर्मन सोशल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये कार्य करतात.

’नेताजी सुभाषचंद्र बोस ऍंड जर्मनी’ नावाचे इंग्रजी पुस्तक

सुरुवातीला अनिता ऑग्सबर्ग विद्यापीठात (University of Augsburg) अर्थशास्त्राच्या प्रवक्त्या होत्या. नंतर त्या प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी ’नेताजी सुभाषचंद्र बोस ऍंड जर्मनी’ (Netaji Subhash Chandra Bose and Germany) नावाचे इंग्रजीत पुस्तक लिहिले आहे. नेताजींच्या इतर चरित्रकारांशी खूप चर्चा करून हे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे ते परिपूर्ण चरित्र असल्याचे म्हटले जाते. या पुस्तकातील सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित काही तथ्ये अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Ajit Pawar : तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश)

इंडो जर्मन सोसायटी ऑफ इंडियाच्या सौजन्याने प्रकाशन

६ फेब्रुवारी २०१३ रोजी त्या भारतात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी या पुस्तकाची पहिली प्रत नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिली. इंडो जर्मन सोसायटी ऑफ इंडियाच्या (Indo German Society of India) सौजन्याने हे पुस्तक प्रकाशित झाले होते. सुभाषबाबू यांच्या कन्या असूनही आणि अनेक मोठमोठी पदे भूषवून देखील त्या अतिशय निर्मळ मनाच्या आहेत असे म्हटले जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.