लुईसने (C.S. Lewis) आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पदवीपूर्व विद्यार्थी म्हणून केली, जिथे त्यांनी ट्रिपल फर्स्ट, हा अभ्यासातील तीन क्षेत्रांमधील सर्वोच्च सन्मान पटकावला. त्यानंतर त्यांची निवड फेलो ऑफ मॅग्डालेन कॉलेज, ऑक्सफर्ड म्हणून झाली. तिथे त्यांनी सुमारे ३० वर्षे काम केले. द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया हे त्यांचे पुस्तक बेस्टसेलर ठरले. १९५६ मध्ये त्यांनी अमेरिकन लेखिका जॉय डेव्हिडमनशी लग्न केले; चार वर्षांनंतर वयाच्या ४५ व्या वर्षी कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला. पुढे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे लुईस २२ नोव्हेंबर १९६३ रोजी वयचया ६५ व्या हे जग सोडून गेले. २०१३ मध्ये त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त लुईस यांना वेस्टमिन्स्टर अॅबे येथे पोएट्स कॉर्नरमध्ये स्मारक निर्माण करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.
३० पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरीत झालेल्या पुस्तकांचे ब्रिटिश लेखक C.S. Lewis
सी.एस. लुईस (C.S. Lewis) यांचे खरे नाव क्लाइव्ह स्टेपल्स लुईस असे होते. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १८९८ रोजी झाला. ते ब्रिटिश लेखक, साहित्यिक विद्वान आणि ऍंग्लिकन धर्मशास्त्रज्ञ होते. त्यांनी मॅग्डालेन कॉलेज, ऑक्सफर्ड आणि मॅग्डालिन कॉलेज, केंब्रिज या दोन्ही ठिकाणी इंग्रजी साहित्यात शैक्षणिक पदे भूषविली होती.
द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया हे त्यांचे सर्वोत्कृष्ट लेखन मानले जाते. द स्क्रूटेप लेटर्स, द स्पेस ट्रायलॉजी या त्यांच्या फिक्शन कलाकृतींसाठी देखील ते ओळखले जातात. लुईस यांनी ३० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पुस्तकांचे ३० पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत.
Join Our WhatsApp Community