Uttarkashi Tunnel Rescue : ‘ते’ सर्व मजूर सुखरूप बाहेर; उत्तरकाशीत जल्लोष

Uttarkashi Tunnel Workers : अनेक अत्याधुनिक पर्याय वापरून झाल्यानंतर शेवटी बोगदा हातानेच खोदून पहिल्या टप्प्यात ५ मजुरांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे.

148
Uttarkashi Tunnel Rescue : 'ते' सर्व मजूर सुखरूप बाहेर; उत्तरकाशीत जल्लोष
Uttarkashi Tunnel Rescue : 'ते' सर्व मजूर सुखरूप बाहेर; उत्तरकाशीत जल्लोष

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यातील सर्व 41 मजूर सुखरूप बाहेर आले आहेत. (Uttarkashi Tunnel Rescue) गेल्या 17 दिवसांपासून या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न चालू होते. अनेक अत्याधुनिक पर्याय वापरून झाल्यानंतर शेवटी बोगदा हातानेच खोदून पहिल्या टप्प्यात ५ मजुरांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. एनडीआरएफच्या (NDRF) टीमने कामगारांना पाईपमधून बाहेर काढले.

जीवनाची लढाई जिंकल्यानंतर बोगद्यातून बाहेर पडणारा पहिला कामगार विजय होरो होता. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर विजय त्याच्या कुटुंबाला भेटला. या सर्व मजुरांना रुग्णवाहिकेने आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

(हेही वाचा – Unseasonal Rain : नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू; एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान)

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केले स्वागत

उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) दुपारीपासूनच या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी वाचवण्यात आलेल्या मजुरांची भेट घेतली. त्यांचे हार घालून स्वागत केले. धामी यांनी बचावकार्यात सहभागी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे (uttarkashi tunnel workers) कौतुक केले आहे. मुख्यमंत्री धामी यांनी बाहेर काढण्यात येत असलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली.

(हेही वाचा – Unseasonal Rain : नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू; एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान)

मोहिमेचे यश सर्वांना भावूक करणारे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही यानंतर ट्वीट करून आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले, उत्तरकाशीतील आपल्या कामगार बांधवांच्या बचाव मोहिमेचे यश सर्वांना भावूक करणार आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की, तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा देतो.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटतील, ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्वांच्या कुटुंबियांनी दाखवलेला संयम आणि धैर्य यांचे जितके कौतुक करावे, तेवढे कमीच आहे.

या बचावकार्यात सहभागी असलेल्या सर्वांच्या भावनेला देखील मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि दृढनिश्चयाने आपल्या कामगार बांधवांना नवीन जीवन दिले आहे. या मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येकाने मानवता आणि सांघिक कार्याचे एक अद्भुत उदाहरण मांडले आहे.”

(हेही वाचा – Milk Rates : शरद पवारांचे खुले पत्र; दूध उत्पादक शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन…)

नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आनंद

या प्रसंगी सर्व स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही या मदतकार्यात कष्ट घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. या मजुरांचे बचावकार्य सुखरूप पार पडल्याविषयी गडकरी यांनी आनंद व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.