Double Decker Bus : वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक आता डबल डेकर बसने करा गारेगार प्रवास

113
Double Decker Bus : वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक आता डबल डेकर बसने करा गारेगार प्रवास
Double Decker Bus : वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक आता डबल डेकर बसने करा गारेगार प्रवास
बेस्टच्या ताब्यात नवीन वातानुकूलित दुमजली बसेस दाखल झाल्यानंतर उपनगरामध्ये या बसेसची सेवा सुरू करण्यात आली आहे या बसेसची वाढती मागणी लक्षात घेता मंगळवारी २८नोव्हेंबर पासून ३१० क्रमांकाच्या बस मार्गावर नविन वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या (Double Decker Bus) वांद्रे बस टर्मिनस ते कुर्ला स्टेशन पश्चिम बस स्थानक या दरम्यान सुरू करण्यात आल्या आहेत.
मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा या दृष्टीने बेस्ट उपक्रम नेहमीच प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २१ फेब्रुवारी २०२३ पासून वातावरणपूरक वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सध्या एकूण ४९ इलेक्ट्रिक दुमजली बसगाडया दाखल झाल्या आहेत.  त्यापैकी २५ बसगाड्या दक्षिण मुंबईत सुरू करण्यात आल्या आहेत. या बसगाड्यांना मुंबईतील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

(हेही वाचा-My Name is VVS Laxman : ईशान किशन जेव्हा आपलं नाव व्ही व्ही एस लक्ष्मण असल्याचं सांगतो…)

मुंबई  उपनगरात राहणाऱ्या प्रवाशांचीही वाढती मागणी लक्षात घेता  बेस्ट उपक्रमातर्फे वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या मुंबईच्या उपनगरातही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंर्तगत  मंगळवारी २८ नोव्हेंबर २०२३ पासून मुंबईच्या उपनगरांमध्ये मुख्यतः कुर्ला, बी.के.सी. या भागातील प्रवाशांची गैरसोय दुर करण्याकरिता बेस्ट उपक्रमातर्फे या भागात १० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या चालविण्यात येत आहेत. जेणे करून जास्तीत जास्त मुंबईकर जनतेस या बसगाड्यांच्या (Double Decker Bus) सेवेचा लाभ घेता येईल.
या बसगाड्या पर्यावरणपुरक असून या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायुप्रदुषण होत नाही. वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाडीमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने बसगाडीमध्ये सीसीटीव्हींची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, या शिवाय प्रवाशांच्या सोईकरिता मोबाईल चार्जिंगची व्यवस्थाही सदर बसगाड्यांमध्ये असून प्रवाशांना या दुमजली बसगाड्यांतून प्रवास करताना इतर सार्वजनिक परिवहन सेवेच्या तुलनेने कमी बसभाडे प्रदान करावे लागत आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=GKtOPyJfRJg

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.