Rex Global Fellowship Award : सेंट झेवियर्सचे प्राध्यापक अवकाश जाधव यांना ‘रेक्स ग्लोबल फेलोशिप पुरस्कार’

112
Rex Global Fellowship Award : सेंट झेवियर्सचे प्राध्यापक अवकाश जाधव यांना 'रेक्स ग्लोबल फेलोशिप पुरस्कार'
Rex Global Fellowship Award : सेंट झेवियर्सचे प्राध्यापक अवकाश जाधव यांना 'रेक्स ग्लोबल फेलोशिप पुरस्कार'
सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई येथील इतिहास विभागाचे प्रमुख असलेले आणि  सामाजिक कार्यकर्ते तसेच मुंबई महापालिकेचे माजी नामनिर्देशित सदस्य प्रा. अवकाश जाधव यांना २६ नोव्हेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे भारताच्या संविधान दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय एनजीओ संघटनांनी सुरू केलेला प्रतिष्ठित ‘रेक्स ग्लोबल फेलोशिप पुरस्कार’ (Rex Global Fellowship Award) प्रदान करण्यात आला.
नागरिकांच्या समस्यांवर त्यांनी विविध सर्वेक्षणे  केली आहेत. ज्यांचा वापर करून सरकारी धोरणे म्हणून आत्मसात केले गेली आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या अपारंपरिक पद्धती आणि विद्यार्थ्यांना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करणे यातून अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे.

(हेही वाचा-Crime : घरात घुसून प्रेयसीवर प्राणघातक हल्ला, प्रियकराला अटक)

मुंबई शहराच्या हेरिटेजमध्ये त्यांचे  मोठे योगदान आहे. विशेषत: मुंबईतील जुन्या पुरातन 53 भूमिगत पाण्याच्या टाक्या शोधणे आणि त्यांचा पुन्हा वापर करण्यास महापालिकेला भाग पाडणे शिवाय मरीन ड्राइव्हचा वारसा आणि सौंदर्यशास्त्र पुनर्संचयित करणे, तसेच मुंबई शहराच्या हेरिटेज जतनासाठी 5 कोटी वाटप करण्यासाठी मान्यता मिळवणे हे उल्लेखनीय आहे.
पालघरच्या विक्रमगड येथील आदिवासी भागात ‘काश फाऊंडेशन मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांचा सुरू असलेला सामाजिक प्रकल्प तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी आजवर १५० कुपोषित बालके दत्तक घेतली गेली आहेत.
१७ सप्टेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय *कोस्टल क्लीन अप ड्राइव्हसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने आणि क्लीन अप मोहिमेसाठी ३५०० हून अधिक विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांचे महाराष्ट्राचे तत्कालिन  राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांनी  कौतुक  केले होते. अध्यापनातील त्यांची २८ यशस्वी वर्षे आणि त्यांची सामाजिक सक्रियता विविध आंतरराष्ट्रीय मंचांद्वारे ओळखली गेली.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=GKtOPyJfRJg

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.