Droupadi Murmu: राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात वाहतुकीत बदल

लोणावळा शहरातील वाहनधारकांनी आपली वाहने शक्यतो आणू नयेत.

175
Droupadi Murmu: राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात वाहतुकीत बदल
Droupadi Murmu: राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात वाहतुकीत बदल
भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुरमू  (Droupadi Murmu) उद्या 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता लोणावळा शहरातील कैवल्यधाम या ठिकाणी येणार आहेत. आय. एन. एस. शिवाजी ते कैवल्यधाम असा त्यांचा प्रवास मार्ग असणार आहे.  जिल्हाधिकारी कार्यालय राजशिष्टाचार विभाग यांच्या पत्रकान्वये उपविभागीय दंडाधिकारी मावळ मुळशी सुरेंद्र नवले यांनी सदरचा आदेश लागू केला आहे. आज मंगळवार, दि. 28 नोव्हेंबर दुपारी 2 वाजल्यापासून उद्या 29 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत हा आदेश लागू असणार आहे
– पुणे बाजूकडून एक्सप्रेस वे वरून येणारी वाहने ही लोणावळा येथे न येता एक्सप्रेस वे ने मुंबईकडे जातील तसेच पुण्याकडून जुन्या हायवे ने येणारी वाहने ही कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस वे ने मुंबई बाजूकडे जातील.
– मुंबई बाजूकडून एक्सप्रेस वे ने येणारी वाहतूक ही खंडाळा एक्झीट येथून खाली न उतरता पुणे बाजूकडे सरळ जातील तसेच लोणावळा एक्झीट ने खाली येऊन पुणे बाजूकडे जातील.
– लोणावळा शहरातील वाहनधारकांनी सदर वेळेत आपली वाहने शक्यतो आणू नयेत.
– ड्रोन, पॅराग्लायडींग तसेच एअर बलून असे लोणावळा शहर व परीसरात उड्डाणास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.