डेंग्यूच्या डासांबरोबरच आता झिका विषाणूचा (Zika Virus) संसर्गही होत असल्याचे आढळल्यामुळे डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात झिका विषाणूबाधित ११ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील सर्वाधिक ७ रुग्णाचा समावेश आहे.
इचलकरंजीमध्ये वृद्धेला, सांगलीत दुसरा रुग्ण, तर कोल्हापुरातील नागाळा पार्कमध्ये तिसऱ्या रुग्णाची नोंद झाली. कोल्हापुरातून पाठवण्यात आलेल्या गरोदर मातांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्याच्या येरवडा भागात १, पालघर जिल्ह्यात २ रुग्ण आढळून आले आहेत.
(हेही वाचा – Anita Bose Pfaff : सुभाष चंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस फाफ)
केंद्र सरकारकडून झिका विषाणूला अटकाव करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापुरात साथरोग निर्मूलन विभागाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक पथक कोल्हापुरात दाखल झाले. केंद्र शासनाचे संशोधन अधिकारी निखिल गोंधळे, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. सोपान अनुसे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने दोन दिवस कोल्हापूर आणि सांगली येथे या विषाणूचा संसर्ग रोखण्याबाबत कार्यशाळा घेतल्या.
हेही पहा –