विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर करण्यात आली होती. नागपूर येथे हे अधिवेशन होणार आहे. अधिवेशन थोडेसे पुढे ढकलावे असे सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांचे मत हे अधिवेशन ७ डिसेंबर ऐवजी ११ डिसेंबर रोजी सुरू करण्यासंदर्भात ही चर्चा होती. ७ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे २० डिसेंबर पर्यंतचे कामकाज दिनदर्शिकेत नमूद करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार असून यामध्ये याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा-Eknath Shinde: भरसभेत मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं, ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक)
७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान दहा दिवस कामकाज होणार असून त्या पुढे कामकाज चालणार आहे की अधिवेशन २० डिसेंबरला गुंडाळलं जाणार आहे, हे विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान दरवर्षी हिवाळी अधिवेशन (Winter Session) शुक्रवारी संपते मात्र या वर्षी तो २० डिसेंबर म्हणजे बुधवारीच गुंडाळल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Join Our WhatsApp Community