Narendra Modi: ४१ मजुरांशी पंतप्रधानांनी साधला संवाद, प्रकृतीची विचारपूस करून धाडसाचे केले कौतुक

पंतप्रधान कार्यालयाचं बचाव कार्यावर लक्ष होतं. 

122

उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्यातून (Uttarakashi tunnel rescue opration) 17 दिवसांच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. या सर्व कामगारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी फोनवर संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसेच 17 दिवस या कठीण परिस्थितीत धैर्य राखल्याबद्दल पंतप्रधानांनी कामगारांचे कौतुकही केले. पंतप्रधान कार्यालयाचं बचाव कार्यावर लक्ष होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवून होते. ते सकाळ-संध्याकाळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून बचाव कार्याची माहिती घेत होते. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारीही बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते.

(हेही वाचा – China : चीनमध्ये नवा आजार, केंद्र सरकारकडून खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात )

४१ मजुरांना बाहेर काढल्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले की,

आमच्या कामगार बांधवांच्या बचाव मोहिम

17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका
सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ मजुरांची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली. ते 17 दिवस बोगद्यात अडकून राहिले. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दरड कोसळल्याने कामगार आत अडकले होते. रेस्क्यू ऑपरेशनच्या अंतिम टप्प्यात रॅट-होल मायनर्स तैनात करण्यात आले होते. त्यांनी भंगारात मॅन्युअली ड्रिलिंग करून बोगद्यात 800 मिमी पाईप टाकले. हे सर्व कामगार उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.