ऋजुता लुकतुके
मुंबईच्या क्रिकेट संघासाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्यांचा स्टार गोलंदाज शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या पुढील दोन सामन्यांसाठी मुंबईकडून खेळणार आहे. ३२ वर्षीय अष्टपैलू गोलंदाज शार्दूल १ डिसेंबरला सौराष्ट्र विरुद्ध आणि ३ डिसेंबरला त्रिपुरा विरुद्ध खेळेल अशी दाट शक्यता आहे.
शार्दूल एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून ३ सामने खेळला. यात त्याने ५१ धावांच्या सरासरीने दोन बळीही घेतले. मुंबईचा संघ विजय हजारे चषक स्पर्धेत अ गटात सध्या अव्वल आहे. त्यांनी आपले तीनही सामने जिंकले आहेत.
(हेही वाचा-Ruturaj Gaikwad Century : ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकाने मोडले फलंदाजीचे ‘हे’ विक्रम )
भारतीय संघ येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. तर भारतीय ए संघाचाही आंतरराष्ट्रीय दौरा प्रस्तावित आहे. आणि दोन पैकी एका तरी संघात शार्दूलला नक्की संधी मिळू शकते. त्यामुळे तो अख्खी विजय हजारे स्पर्धा खेळू शकत नाही. पुढील दोन सामन्यांसाठी मात्र तो उपलब्ध राहणार आहे. मुंबईचा पुढील सामना बुधवारी पाँडेचेरी संघाशी होणार आहे.
शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सकडून खेळत होता. पण, संघाने अलीकडे प्रसिद्ध केलेल्या यादीप्रमाणे त्याला सेवेतून मुक्त केलं आहे. त्यामुळे १२ डिसेंबरला होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात शार्दूलवरही बोली लावली जाईल. येत्या काही स्पर्धा शार्दूलसाठी खूप महत्त्वाच्या असतील.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community