मागच्या महिन्यात भाज्यांचे दर स्थिरावले होते. मात्र काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीठ झाली यामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये भाज्यांची आवक घेतली असून यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रति किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात ग्राहकांकडून अव्वाचे सव्वा दर आकारुन ग्राहकांची लुट केली जात आहे. शिवाय, टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार गेले आहेत. या दर वाढीमुळे नागरिकांना महागाईची झळ बसू लागली आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. (Increase In Vegetable Prices)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाशिक, नगर तसेच इतर जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मुंबई, ठाणे उपनगरात भाज्यांची आवक घटली आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ ते १० टक्क्यांनी आवक घटली आहे. दोन दिवसापूर्वी बाजार समितीत भाज्यांच्या ५५० ते ६०० गाड्या दाखल झाल्या होत्या. तर, मंगळवारी या गाड्यांच्या संख्येत घट झाली असून ४५० ते ५०० गाड्याच दाखल झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आवक घटल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. (Increase In Vegetable Prices)
(हेही वाचा : Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या निर्णयाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक)
टोमॅटो आणि कांद्याचे दर गगनाला
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत १० टक्के नविन कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात ४६ रुपये प्रति किलोने कांदा विक्री करण्यात येत आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात अद्यापही कांद्याची विक्री ७० रुपये प्रति किलोने करण्यात येत आहे, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा – बटाटा मार्केटचे सहाय्यक सचिव बाळासाहेब टावरे यांनी दिली. टोमॅटोची घाऊक बाजारात प्रतिकिलो ३८ रुपयांनी विक्रि होत आहे तर, किरकोळ बाजारात मात्र प्रति किलो ७० रुपयांनी विक्री करण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वी ५० रुपयांनी टोमॅटोची विक्रि होत होती. यामुळे टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार गेले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community