राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार की, ११ डिसेंबरपासून याबाबतचा गोंधळ होता, मात्र अखेर आज हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली आहे. मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहिर करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत होती. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे तसेच १९ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – Modern Bus Stand: आळंदी, देहू, पंढरपुरात अत्याधुनिक बस स्थानकं, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक)
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा झाली होती, मात्र गेल्या आठवड्यात अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी चर्चा होती. दुसऱ्या दिवशी आरक्षण आदी विषयांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होईल आणि २० डिसेंबरला अधिवेशन संपवले जाईल. म्हणजे केवळ ८ दिवसांचे अधिवेशन होईल.
अधिवेशनाची वेळ वाढवण्याची मागणी
मराठा आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राची भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या मुद्द्यांवरून अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता असल्यामुळे अधिवेशनाची वेळ वाढवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community