Future of Virat, Rohit : विराट कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार, रोहित शर्माची उपलब्धता अजून अनिश्चित

वयाची पस्तिशी ओलांडलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा पुढील काळात क्रिकेट खेळण्याविषयी काय निर्णय घेतात यावर आता चर्चा सुरू झाली आहे. 

130
Future of Virat, Rohit : विराट कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार, रोहित शर्माची उपलब्धता अजून अनिश्चित
Future of Virat, Rohit : विराट कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार, रोहित शर्माची उपलब्धता अजून अनिश्चित
  • ऋजुता लुकतुके

वयाची पस्तिशी ओलांडलेले विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील काळात क्रिकेट खेळण्याविषयी काय निर्णय घेतात यावर आता चर्चा सुरू झाली आहे. (Future of Virat Rohit)

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अनपेक्षितपणे पराभव पत्करावा लागला. हे अपयश मागे टाकून आता ताज्या दमाचा भारतीय संघ (Indian team) सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाबरोबर टी-२० मालिका खेळत आहे. पण, विश्वचषकाचा कार्यक्रम खेळाडूंना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकवणारा होता. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) अशा वयाची पस्तिशी ओलांडलेल्या खेळाडूंविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. (Future of Virat Rohit)

ही चर्चा निवृत्तीची नाही तर ज्येष्ठ खेळाडू आता सरसकट सगळ्या प्रकारचं क्रिकेट सतत खेळतील का, अशी ही चर्चा आहे. भारतीय संघासमोर पुढील आव्हान आहे ते दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं ८ डिसेंबरपासून होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२० आणि एकदिवसीय सामने तर २ कसोटी सामने खेळणार आहे. (Future of Virat Rohit)

अशावेळी विराट कोहली (Virat Kohli) टी-२० आणि एकदिवसीय अशा दोन्ही मालिकांतून माघार घेणार असल्याचं समोर आलं आहे. या कालावधीत विश्रांती घेऊन तो कसोटी मालिकेसाठी संघात पुन्हा दाखल होईल. २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली या प्रकारापासून दूरच राहिला आहे. पण, यावेळी त्याने एकदिवसीय मालिकेदरम्यानही विश्रांतीचा निर्णय घेतल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय. (Future of Virat Rohit)

विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या साखळी सामन्या दरम्यान ११ नोव्हेंबरला विराटने आपला ३५ वा वाढदिवस साजरा केला होता आणि याच सामन्यात त्याने सचिन तेंडुलकरचा ४९ एकदिवसीय शतकांचा विक्रमही मोडला होता. (Future of Virat Rohit)

(हेही वाचा – Sheetal Devi : भारताची पॅरा – तिरंदाज शीतल देवी जागतिक पॅरा क्रमवारीत अव्वल स्थानावर)

आता पुढील वाटचाल करताना विराट तंदुरुस्ती आणि संघाची गरज बघून दौऱ्यांची निवड करेल असं बोललं जातंय. सध्याच्या घडीला विराट हा भारतीय संघातील सगळ्यात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानला जातो. आताही चार वर्षांनंतर होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषकात तो संघात असेल अशीच आशा त्याच्याबद्दल बाळगली जातेय. (Future of Virat Rohit)

दुसरीकडे रोहित शर्माही (Rohit Sharma) आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिका खेळणार नाही, अशीच शक्यता आहे. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिका तो खेळू शकेल. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची निवड समिती येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिरा दौऱ्यासाठीचा संघ निवडेल. तेव्हा नेमकं चित्र स्पष्ट होईल. (Future of Virat Rohit)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.