-
ऋजुता लुकतुके
राहुल द्रविड (Rahul Dravid) सह फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकांनाही बीसीसीआयकडून (BCCI) मुदतवाढ मिळाली आहे.
अपेक्षेप्रमाणेच बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि त्यांच्या कोचिंग सहकाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. पुढील दोन वर्षांसाठी त्यांच्या करारांचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. ‘बीसीसीआयची (BCCI) राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. आणि दोन्ही गटांनी एका नवीन ध्येयाने एकत्र येऊन भारतीय संघासाठी (Indian team) काम करायचं ठरवलं आहे. त्यामुळे राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि त्यांचे इतर सहकारी अशा सगळ्यांच्याच कराराचं नुतनीकरण करण्यात येत आहे,’ असं बीसीसीआयने (BCCI) बुधवारी अधिकृत पत्रक काढून स्पष्ट केलं.
NEWS 🚨 -BCCI announces extension of contracts for Head Coach and Support Staff, Team India (Senior Men)
More details here – https://t.co/rtLoyCIEmi #TeamIndia
— BCCI (@BCCI) November 29, 2023
बीसीसीआयने (BCCI) राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी प्रशिक्षक म्हणून आणि लक्ष्मण यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) केलेल्या कामाचा गौरव या पत्रकात केला आहे. (Rahul Dravid Extension)
‘राहुल आणि लक्ष्मण यांनी मैदानावर अनेक भागिदाऱ्या रचल्या. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटसाठी अलीकडच्या काळात दोघांनी एकत्र येऊन भरीव योगदान दिलं आहे. दोघांची व्यावसायिक वृत्ती अतुलनीय आहे,’ असं बीसीसीआयच्या (BCCI) या पत्रकात म्हटलं आहे. राहुल द्रविड यांच्याबरोबरच फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे तसंच क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलिप यांनाही मुदतवाढ मिळाली आहे. (Rahul Dravid Extension)
आता ही प्रशिक्षकांची फळी आगामी दक्षिण आफ्रिका दौरा, पुढे इंग्लंड बरोबर घरच्या मैदानावर होणारी कसोटी मालिका, श्रीलंकेबरोबरची एकदिवसीय मालिका आणि पुढे २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणारी वर्ल्ड टी-२० स्पर्धेपर्यंत भारतीय संघाबरोबर असेल. (Rahul Dravid Extension)
(हेही वाचा – Nasa Offer : नासाची इस्रोला मोठी ऑफर, २०२४ मध्ये अंतराळात भारत रचणार इतिहास)
राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी २०२१ च्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांच्याकडून प्रशिक्षक पदाची धुरा हातात घेतली. आणि त्यानंतर कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषकातही उपविजेते होण्याची मजल भारतीय संघाने मारली आहे. प्रशिक्षकपदी मुदतवाढ मिळाल्यानंतर राहुल द्रविडने बीसीसीआयचे आभार मानतानाच पत्नी आणि मुलांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं, अशी कृतज्ञताही व्यक्त केली आहे. (Rahul Dravid Extension)
त्याचबरोबर पत्नी आणि मुलांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं, असंही त्यांनी बोलून दाखवलं. (Rahul Dravid Extension)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community