BMC : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान करण्यापूर्वी महापालिका आणि पोलीस यांना कळवण्याचे आवाहन

BMC : वाहनांचे नियंत्रण करणे, तसेच कचरा संकलन यांचे याेग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी पालिकेचे आवाहन

138
BMC : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान करण्यापूर्वी महापालिका आणि पोलीस यांना कळवण्याचे आवाहन
BMC : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान करण्यापूर्वी महापालिका आणि पोलीस यांना कळवण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvana Day) ६ डिसेंबर रोजी आहे. यानिमित्त महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून चैत्यभूमी (Chaityabhoomi), मुंबई येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांना विविध सामाजिक संस्थांमार्फत अन्न वितरण करण्यात येते. अन्नदानासाठी इच्छुक असलेल्या संघटना, संस्था, व्यक्ती आदींनी जी उत्तर विभागाचे सहायक अभियंता आणि शिवाजी पार्क (Shivaji Park) पोलिस ठाणे यांना ४ डिसेंबर पर्यंत लेखी स्वरूपात कळवावे, असे आवाहन जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

(हेही वाचा – Rahul Dravid Extension : राहुल द्रविड आणि त्यांच्या कोचिंग सहकाऱ्यांना मुदतवाढ)

सुसज्ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Day) अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) चैत्‍यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह यांसह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कामे चालू आहेत.

नियोजन आणि अंमलबजावणी यांसाठी पूर्वकल्पना द्या

प्राचार्य एम. एम. पिंगे चौक, राजा बढे चौक लगत, ट्रॉफिमा हॉटेलच्या बाजूला, शिवाजी पार्क, एस.एच. परळकर मार्ग (विष्णु निवासाजवळ) आणि पद्माबाई ठक्कर, वेस्ट साईडच्या मागे आदी ४ ठिकाणी अनुयायांना अन्न वितरण करता येणार आहे. त्‍यासाठी संबंधितांनी महानगरपालिका (BMC) व शिवाजी पार्क (Shivaji Park) पोलिस ठाणे यांना कळवावे.

जेणेकरून सदर कामादरम्यान अन्न सुनियंत्रित पद्धतीने वितरण करणे, अन्न वितरणाकरता येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण करणे, तसेच कचरा संकलन करणे इत्यादी बाबींचे उचित प्रकारे नियोजन आणि अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे आवाहन महानगरपालिकेच्या (BMC) जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.