Marathi Sign Board : कारवाईचा बडगा सुरूच, दुसऱ्या दिवशीही १६१ दुकाने व आस्थापनांवर कारवाई

या कारवाईसाठी मुंबईतील २४ विभागांमध्ये दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले असून त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले आहेत.

146
Marathi Sign Board : कारवाईचा बडगा सुरूच, दुसऱ्या दिवशीही १६१ दुकाने व आस्थापनांवर कारवाई
Marathi Sign Board : कारवाईचा बडगा सुरूच, दुसऱ्या दिवशीही १६१ दुकाने व आस्थापनांवर कारवाई

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व कंपन्यांवर मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. याचीच अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारपासून महापालिकेने कारवाई सुरू केली. बुधवारी (२९ नोव्हेंबर) ३ हजार ५७५ दुकाने आणि आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात देवनागरी लिपीमध्ये ३ हजार ४१४ नामफलक आढळले. तर, सर्वोच्च न्यायालयाचे तसेच कायद्यातील निर्देशांचे पालन न केलेल्या १६१ दुकाने व आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. (Marathi Sign Board)

या कारवाईसाठी मुंबईतील २४ विभागांमध्ये दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले असून त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि कायद्यातील तरतुदी यांचा भंग करणाऱ्या दुकानदारांना सर्वप्रथम तपासणी पत्र धाडण्यात येईल. या पथकांनी काल, मंगळवार,( २८ नोव्हेंबर) रोजी ३ हजार २६९ दुकाने व कंपन्यांना भेटी दिल्या. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात ३ हजार ९३ पाट्या आढळल्या. तर, सर्वोच्च न्यायालयाचे तसेच कायद्यातील निर्देशांचे पालन न केलेल्या १७६ दुकाने व कंपन्यांवर नियमाधीन कारवाई करण्यात आली होती. (Marathi Sign Board)

(हेही वाचा : NCP Hearing : अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही; शरद पवार गटाचा अजित पवार गटाला प्रश्न)

मागील दोन दिवसात मिळून ६ हजार ८४४ दुकाने व आस्थापनांना भेटी देण्‍यात आल्‍या. त्‍यापैकी ६ हजार ५०७ दुकाने व कंपन्यांच्या पाट्या मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात आढळले आहेत. तर, ३३७ दुकाने व  कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या पुढील काळातही ही कारवाई सुरू राहणार आहे. मुंबईतील सर्व दुकाने व कंपन्यांना मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. (Marathi Sign Board)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.