Ajit Pawar : धरमतर, बाणकोट खाडी पुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला गती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी, या महामार्गाचे काम गेल्या चार दशकांहून अधिक काळ रखडले आहे.

192
Ajit Pawar : धरमतर, बाणकोट खाडी पुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
Ajit Pawar : धरमतर, बाणकोट खाडी पुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी. त्या अनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रुंदी साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला येथे दिले. (Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री पवार यांनी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामकाजाचा आढावा मंत्रालयातील त्यांच्या दालनात घेतला. रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला गती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी, या महामार्गाचे काम गेल्या चार दशकांहून अधिक काळ रखडले आहे. महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी मार्च २०२२ मध्ये प्रकल्पाच्या अंतिम आखणीस शासन स्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. (Ajit Pawar)

त्याचप्रमाणे रेवस ते कारंजा खाडी दरम्यानच्या धरमतर खाडी पुलासाठी ३ हजार ५७ कोटींच्या अंदाजित खर्चाच्या बांधकामास देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, मेरिटाईम बोर्डामार्फत नौकावहनासाठी आवश्यक असणाऱ्या गाळ्याची उंची व रुंदीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने या पुलाच्या निविदेबाबतची पुढील कार्यवाही करता आली नाही. त्यामुळे धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाचे काम तात्काळ सुरु होण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने आवश्यक बाबींची पूर्तता करून गतीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Rahul Dravid Extension : राहुल द्रविड आणि त्यांच्या कोचिंग सहकाऱ्यांना मुदतवाढ)

महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या किनारपट्टीवर १४ छोटी बंदरे व २ प्रमुख बंदरे आहेत. पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रेवस ते रेड्डी महामार्गाची नव्याने आखणी करण्याचे ठरले आहे. त्यानुसार सर्व्हेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.