राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि निवडणूक चिन्ह या मुद्यावर बुधवारी (२९ नोव्हेंबर) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी शरद पवार गटाच्यावतीने युक्तीवाद केला. वकील गुरुदत्त कामत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे शरद पवार गटाची बाजू मांडत शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत अध्यक्ष असल्याचा पुनरुच्चार केला. (NCP Hearing)
पक्ष हुकूमशाही पद्धतीने चालवीला जात होता तर उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी सप्टेंबरमध्ये अध्यक्ष पदाची निवडणूक का लढविली नाही? एवढेच नव्हे तर, शरद पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अजित पवार यांची सही आहे. यामुळे अजित पवार यांच्याकडून केला जात असलेला दावा चुकीचा आहे, असेही कामत यांनी आयोगाला सांगितलं. कामत यांनी यावेळी अर्जुन सिंह विरूद्ध कॉंग्रेस (Congress) आणि शरद यादव यांच्या विरुद्ध संयुक्त जनता दल या दोन्ही प्रकरणाची सुनावणी करताना आयोगाने दिलेल्या निकालाची माहिती आयोगापुढे सादर केली. (NCP Hearing)
(हेही वाचा – Marathi Sign Board : कारवाईचा बडगा सुरूच, दुसऱ्या दिवशीही १६१ दुकाने व आस्थापनांवर कारवाई)
याशिवाय शरद सिन्हा विरूद्ध के जी कृष्णन आणि पीए संगमा यांच्या प्रकरणाचा दाखला देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) दिला. अजित पवार यांना समर्थन देणाऱ्या सर्व आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारीच्या आत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायला सांगितलं आहे यामुळे आमदारांनी अजित पवार यांना दिलेलं समर्थन बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कामत यांनी केला. (NCP Hearing)
कामत यांनी अजित पवार गटाचे वकील मिडियाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप सुद्धा कामत यांनी केला. अजित पवार गटाचे वकील ही सुनावणी ४-५ दिवसात संपणार असल्याचे सांगत आहेत. ते असे कसे सांगू शकतात, असा प्रश्न कामत यांनी केला. सोमवारी शरद पवार यांच्याच गटाचा युक्तिवाद होणार आहे. मंगळवारी अजित पवार गटाकडून रिजॉइंडर सादर केले जाईल. (NCP Hearing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community