Cabinet Decision : राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा

203
Cabinet Decision : राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Cabinet Decision : राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यास बुधवारी (२९ नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. (Cabinet Decision)

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळा या अभियानात सहभागी असतील. मुंबई महानगरपालिका, वर्ग-अ आणि वर्ग-ब महानगरपालिका शाळा, उर्वरित महाराष्ट्र अशा ३ स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येईल. क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट राहील. ४५ दिवसांमध्ये हे अभियान राबवायचे आहे. या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी मिळून १०० गुण असतील. (Cabinet Decision)

(हेही वाचा – Cabinet Decision : एसआरए सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)

शाळांच्या मूल्यांकनासाठी महानगरपालिका स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील तर उर्वरित महाराष्ट्रासाठी केंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती असेल. याशिवाय तालुका, जिल्हास्तरांवर देखील गटविकास अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समित्या राहतील. प्रत्येक विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या ३ क्रमांकासाठी निवड करण्यात येईल. याकरिता शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती राहील. (Cabinet Decision)

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना पहिले पारितोषिक २१ लाख रुपये, दुसरे पारितोषिक ११ लाख रुपये, तिसरे पारितोषिक ७ लाख मिळेल. तर उर्वरित महाराष्ट्रामधील शाळांना देखील तालुका, जिल्हा तसेच विभागनिहाय पारितोषिके मिळतील. राज्य स्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाख रुपयांचे असून दुसरे पारितोषिक २१ लाख रुपये आणि तिसरे ११ लाख रुपयांचे असेल. या अभियानासाठी २० कोटी ६३ लाख रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. (Cabinet Decision)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.