Indian Navy Demonstrations : सिंधुदुर्गवासीय अनुभवणार भारतीय नौदलाचा साहसी थरार

Indian Navy Demonstrations : भारतीय नौदलाकडून 4 डिसेंबर 2023 रोजी भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावरील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच्या समुद्रात नौदलाची जहाजे आणि विमाने यांची प्रात्यक्षिके होणार आहेत. यामुळे नौदलाच्या कार्यक्षमतेचे दर्शन घडेल.

261
Indian Navy Demonstrations : सिंधुदुर्गवासीय अनुभवणार भारतीय नौदलाचा साहसी थरार
Indian Navy Demonstrations : सिंधुदुर्गवासीय अनुभवणार भारतीय नौदलाचा साहसी थरार

भारतीय नौदलाकडून 4 डिसेंबर रोजी पश्चिम सागरी किनाऱ्यावरील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच्या (Sindhudurg Forts) समुद्रात नौदलाची जहाजे आणि विमाने यांची प्रात्यक्षिके होणार आहेत. नौदल (Indian Navy) प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरिकुमार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तारकर्ली समुद्रकिनारी (Tarkarli Beach) केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, लष्करी अधिकारी आणि स्थानिक नागरिक या प्रात्यक्षिकांचा थरार अनुभवू शकतील. (Indian Navy Demonstrations)

(हेही वाचा – Cabinet Decision : एसआरए सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)

समृद्ध सागरी इतिहासाची साक्ष

आपल्या समृद्ध सागरी इतिहासाचा गौरव करणे आणि वसाहतवादी प्रथांचा त्याग करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1660 मध्ये बांधलेला, सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Forts) भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाची साक्ष देतो. त्यासह तेथे नौदलाची प्रात्याक्षिके सादर करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रात्यक्षिके होणार आहेत.

नौदलाच्या तळाव्यतिरिक्त प्रथमच आयोजन

भारतीय नौदल (Indian Navy), नौदलाच्या तळाव्यतिरिक्त अशा दिमाखदार कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करत आहे. सिंधुदुर्ग किल्ला मुंबईपासून 550 किमी आणि गोवा येथील नौदल तळापासून सुमारे 135 किमी अंतरावर आहे. या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनासह नौदलाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

(हेही वाचा – NCP Hearing : शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; शरद पवार गटाचे विविध दाखले आयोगापुढे सादर)

अत्याधुनिक जहाजे आणि विमाने पहाता येणार

1971 च्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने कराची बंदरावर ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ (Operation Trident) अंतर्गत केलेल्या साहसी आक्रमण केले होते. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ भारतीय नौदल 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करते. नौदलाच्या जवानांचे शौर्य आणि धैर्य, तसेच प्रतिकूल परिस्थितीत अशक्य ते साध्य करण्याचा त्यांचा संकल्प साजरा करण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतीय नौदलाची अत्याधुनिक जहाजे आणि विमाने सर्वसामान्य जनतेला आणि ऑनलाइन दर्शकांना थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवली जातील. (Indian Navy Demonstrations)

प्रमुख आकर्षण
  • नौदलाच्या 20 युद्धनौका (warship)
  • मिग 29K आणि LCA
  • नौदलाची 40 विमाने
  • मरीन कमांडोज द्वारे हल्ल्यांचे प्रात्यक्षिक
  • नौदल बँडचे सादरीकरण, ड्रिल
  • एससीसी कॅडेट्सचे हॉर्न पाईप नृत्य

धक्क्यावरील जहाजांवर रोषणाई करून कार्यक्रमाचा समारोप होईल. सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शो होईल. (Indian Navy Demonstrations)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.