Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा!

दुपारी १२ ते रात्री १२ पाणीपुरवठा राहणार बंद

506
Ratnagiri: शहरात दर सोमवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार
Ratnagiri: शहरात दर सोमवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे, ठाणे (Thane) महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवार, १ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते रात्री १२ असे १२ तास एमआयडीसीकडून येणारा पाणी पुरवठा (Water Cut) बंद राहणार आहे.

‘या’ भागात पाणी पुरवठा बंद

या दुरुस्तीच्या काळात, ठाणे (Water Cut) महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा प्रभाग समितीतील सर्व भाग तसेच, वागळे प्रभाग समिती रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर, तसेच, मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद राहील.

(हेही वाचा – Telangana Assembly Election 2023 : एकूण ११९ जागांसाठी मतदान)

वरील दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा (Water Cut) पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या (Water Cut) पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.