Dr. Jagdishchandra Bose : भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस

277
Dr. Jagdishchandra Bose : भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस
Dr. Jagdishchandra Bose : भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस

जगदीशचंद्र बोस (Dr. Jagdishchandra Bose) यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी बंगालमधील (आता बांगलादेश) ढाका जिल्ह्यातील मेमनसिंह, फरीदपूर येथे एका प्रख्यात बंगाली कायस्थ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भगवान चंद्र बोस हे ब्राह्मो समाजाचे नेते होते आणि ते फरीदपूर, बर्धमान आणि इतर ठिकाणी उप-मॅजिस्ट्रेट होते.

जगदीशचंद्र बोस यांना जीवशास्त्रात खूप रस होता. वयाच्या २२ व्या वर्षी ते वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले. पण तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा विचार सोडून दिला आणि केंब्रिजच्या क्राइस्ट कॉलेजमध्ये गेले आणि तिथे फिजिक्सचे प्रसिद्ध प्राध्यापक फादर लाफोंट यांनी बोस यांना भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रेरित केले. १८८५ मध्ये ते मायदेशी परतले आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवू लागले.

बोस हे एक चांगले शिक्षक देखील होते, त्यांनी वर्गात शिकवण्यासाठी वैज्ञानिक प्रात्यक्षिकांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला. बोस यांचे विद्यार्थी सतेंद्र नाथ बोस नंतर प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ झाले. जगदीशचंद्र बोस (Dr. Jagdishchandra Bose) यांनी अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले. त्यांनी वायरलेस सिग्नल पाठवण्यात असाधारण प्रगती केली आणि रेडिओ संदेश कॅप्चर करण्यासाठी अर्धसंवाहकांचा वापर करणारे ते पहिले व्यक्ती ठरले.

(हेही वाचा-Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा!)

परंतु आपल्या शोधांचा व्यावसायिक फायदा घेण्याऐवजी, इतर संशोधकांना त्यावर काम करता यावे म्हणून त्यांनी ते सार्वजनिकरित्या प्रकाशित केले. यानंतर त्यांनी वनस्पती जीवशास्त्रात अनेक शोध लावले. त्यांनी क्रेस्कोग्राफ नावाच्या साधनाचा शोध लावला. त्यांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध लावून त्यांनी बॅटरी विकसित केली.

इरिटेबिलिटी ऑफ प्लॅंट्स, इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लॅंट्स, ट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लॅंट्स, दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स, प्लॅंट रिस्पॉन्स, दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस, दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स, रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग, लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लॅंट्स ही पुस्तके त्यांनी लिहिली (Dr. Jagdishchandra Bose) आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.