मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्याला येवला (Yeola) मतदारसंघातून विरोध होत आहे. भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद सुरु आहे. अशातच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज छगन भुजबळ हे येवलाचा दौरा करणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यावरून पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा!)
मराठा समाजाकडून भुजबळांना विरोध
“आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही (Chhagan Bhujbal) बांधावर येऊ नका, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तसंच शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, पण आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणा देखील देण्यात आल्या. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. यावर “मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही” असं भुजबळ म्हणाले.
(हेही वाचा – Indian Navy Demonstrations : सिंधुदुर्गवासीय अनुभवणार भारतीय नौदलाचा साहसी थरार)
मी कुणाला घाबरत नाही
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बुधवारी रात्री येवल्यात दाखल झाले. गुरुवारी सकाळी ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही असं भुजबळ म्हणाले. मराठ्यांना जर ओबीसीमध्ये बळजबरीनं टाकलं तर त्यांना काहीच मिळणार नाही, मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात येतं असंही ते पुढे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community