-
ऋजुता लुकतुके
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतल्यानंतर गुजरात संघाने कप्तानी शुभमन गिलकडे सोपवली आहे. त्याने एका व्हीडिओत संघ सहकाऱ्यांसाठी एक संदेश दिला आहे. (Shubman Gill New GT Captain)
आधीचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीकडे परत गेल्यानंतर, गुजरात टायटन्स संघाने शुभमन गिलकडे कप्तानी सोपवली. गिल २०२१ पासून गुजरात टायटन्स संघासाठी खेळतोय. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ९१ सामन्यांत २,७९० धावा केल्या आहेत त्या ३७ धावांच्या सरासरीने. यात त्याने तीन शतकंही ठोकली आहेत आणि ही तीनही शतकं त्याने गुजरात संघाकडून गेल्या हंगामात केली आहेत. (Shubman Gill New GT Captain)
त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळेच हार्दिक पांड्यानंतर संघ व्यवस्थापनाने कर्णधार म्हणून शुभमनवर विश्वास दाखवला आहे, आणि या जबाबदारीचं पूर्ण भान असल्याची प्रतिक्रिया शुभमनने गुजरात टायटन्सने प्रसिद्ध केलेल्या गिलच्या पहिल्याच व्हीडिओ मुलाखतीत दिली आहे. (Shubman Gill New GT Captain)
‘दोनच वर्षांत एवढी मजल मारलेल्या संघाचा कर्णधार झालोय ही गोष्ट अजून मनात झिरपलेलीच नाही. कदाचित पहिला सामना खेळेपर्यंत मला ती जाणीव होणार नाही. पण, मिळालेली जबाबदारी मोठी आहे हे समजून ती निभावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन,’ असं शुभमनने या व्हीडिओत म्हटलं आहे. (Shubman Gill New GT Captain)
😍 From a dreamy eyed fanboy of the IPL to a captain of the Gujarat Titans! Aapdo Shubman is raring to own his latest designation! Hear his first words from a brand new chapter… 💙#TitansFAM, ready for a new era of leadership? 💙#AavaDe pic.twitter.com/vmIN7I4LQY
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 29, 2023
(हेही वाचा – India To Tour Sri Lanka : भारतीय संघ पुढील वर्षी श्रीलंकेत खेळणार ६ एकदिवसीय व टी-२० सामने )
‘माझा रणजी संघ आणि भारतीय संघाकडून खेळतानाही मी सर्वोच्च दर्जाच्या काही कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे. त्यांच्याकडून क्रिकेटच्या चार गोष्टी शकलो आहे. त्याच अंमलात आणून गुजरात संघाचंही नेतृत्व करेन,’ असा विश्वास त्याने बोलून दाखवला आहे. (Shubman Gill New GT Captain)
तर कर्णधार म्हणून कुठले गुण आवश्यक वाटतात या प्रश्नाला उत्तर देताना त्याने, ‘संघाप्रती निष्ठा, शिस्त, कठोर मेहनत आणि बांधिलकी,’ या गुणांचा उल्लेख केला. हेच गुण संघातील सर्वांनी बाणवले तर विजय दूर नसेल, असं शुभमनला वाटतं. (Shubman Gill New GT Captain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community