Narayana Murthy : भारतियांनी 3 शिफ्टमध्ये काम करावे; नारायण मूर्ती यांचे कामाच्या तासांविषयी पुन्हा भाष्य

Narayana Murthy : सरकारने पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्राधान्याने हाताळले पाहिजेत आणि त्यासाठी उद्योगातील लोकांना 3 शिफ्टमध्ये काम करावे लागेल, असे नारायण मूर्ती म्हणाले आहेत.

179
Narayana Murthy : भारतियांनी 3 शिफ्टमध्ये काम करावे; नारायण मूर्ती यांचे कामाच्या तासांविषयी पुन्हा भाष्य
Narayana Murthy : भारतियांनी 3 शिफ्टमध्ये काम करावे; नारायण मूर्ती यांचे कामाच्या तासांविषयी पुन्हा भाष्य

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी यापूर्वी भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. आता त्यांनी भारतियांच्या कामाच्या तासाविषयी पुन्हा भाष्य केले आहे. सरकारने पायाभूत सुविधांचे प्रकल्प (Infrastructure projects) प्राधान्याने हाताळले पाहिजेत आणि त्यासाठी उद्योगातील लोकांना 3 शिफ्टमध्ये (work in 3 shifts) काम करावे लागेल, असे त्यांनी या वेळी सांगितले. बंगळुरू (Bangalore) येथील ‘टेक समिट 2023’च्या (Tech Summit 2023) 26 व्या कार्यक्रमात ते बोलत होते.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : आमदारांनी पूर्ण काळ अधिवेशनास उपस्थित राहावे; स्वतः मात्र दोनच दिवस उपस्थित राहणार)

नारायण मूर्ती म्हणाले, ”भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) 3.5 ट्रिलियन डॉलर्सची आहे, तर चीन 19 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. एके काळी तिथेही आपल्यासारख्या समस्या होत्या, पण चीनने त्यावर उपाय शोधून काढला आणि आपल्या पुढे गेला. आपण अजूनही चीनशी बरोबरी करू शकतो आणि त्यांच्या पुढे जाऊ शकतो; पण त्यासाठी आपल्याला वेगवान निर्णय घ्यावे लागतील.”

झेरोधाचे (Zerodha) सह-संस्थापक निखिल कामत यांनी ‘पुढील 5-10 वर्षांत बंगळुरूने (Bangalore) एक चांगले शहर बनण्यासाठी काय केले पाहिजे?’, असा प्रश्न नारायण मूर्ती यांना विचारला. त्या वेळी नारायण मूर्ती म्हणाले की, परदेशातील लोक दोन शिफ्टमध्ये काम करतात, त्यामुळेच ते आपल्यापेक्षा पुढे आहेत.

(हेही वाचा – Mumbai Gujarat Bullet Train : बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा ऑगस्ट 2026 मध्ये होणार; रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती)

… त्यांनी समाजाच्या कल्याणात योगदान द्यावे

समिटमध्ये मूर्ती यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवांबद्दल सांगितले की, “मी मोफत सेवांच्या विरोधात नाही; पण जे मोफत सेवा आणि अनुदान सरकार घेत आहेत, अशा सर्व लोकांनी याच्या मोबदल्यात समाजाच्या कल्याणात योगदान द्यावे. मोफत योजना या सशर्त असायला हव्यात. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील उपस्थिती 20 टक्के वाढली, तरच या सेवा उपलब्ध होतील, असे सरकारने लोकांना सांगावे.

यापूर्वी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला 

यापूर्वी नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याविषयी भाष्य केले होते, तेव्हा सोशल मीडिया बरीच चर्चा झाली होती. या विधानानंतर मूर्ती यांना काही जणांनी पाठिंबा दिला, तर काही जणांनी त्यांच्यावर टीका केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.