MS Dhoni : एम एस धोनीचा मर्सिडिज जीप चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल, गाडीची नंबर प्लेट का वेधून घेतेय लक्ष?

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा मर्सिडिज जी गाडी चालवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे आणि या गाडीच्या नंबर प्लेटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

919
MS Dhoni : एम एस धोनीचा मर्सिडिज जीप चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल, गाडीची नंबर प्लेट का वेधून घेतेय लक्ष?
MS Dhoni : एम एस धोनीचा मर्सिडिज जीप चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल, गाडीची नंबर प्लेट का वेधून घेतेय लक्ष?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा मर्सिडिज जी गाडी चालवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे आणि या गाडीच्या नंबर प्लेटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (MS Dhoni)

माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्तीनंतरही मीडियामध्ये चर्चेत असतो. अलीकडेच ४२व्या वर्षीही धोनीला चेन्नई सुपरकिंग्ज संघाने कप्तानीसाठी पसंती दिल्यामुळे तो चर्चेत होता. चेन्नईने संघात कायम राखलेल्या खेळाडूंच्या यादीत धोनीचा क्रमांक सगळ्यात वरचा होता. (MS Dhoni)

ही चर्चा संपते न संपते आता धोनीचा रांची शहरात मर्सिडिजची जी क्लास गाडी चालवतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या एका मित्रासोबत धोनी वेगात ही गाडी चालवताना दिसतोय. गाडीचा रंगही धोनीचा लाडका काळा आहे. (MS Dhoni)

धोनीच्या मित्राने हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि ‘काही नाती ही न तुटणारी असतात,’ असं कॅप्शन या फोटोला त्याने दिलं आहे. पण, या व्हिडिओतही चाणाक्ष चाहत्यांच्या नजरेतून गाडीची नंबर प्लेट सुटलेली नाही. गाडीचा नोंदणी क्रमांक आहे ०००७. धोनीने आपल्या कारकीर्दीत कायम ७ क्रमांकाची जर्सीच घातली होती. दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोने हा क्रमांक लोकप्रिय केला. (MS Dhoni)

(हेही वाचा – Aarey Forest : आरे मधून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना ग्रीन टोल लागणार?)

आणि भारतात महेंद्र सिंग धोनीने ते परिधान केला. भारतीय संघ तसंच चेन्नई सुपरकिंग्जच्या जर्सीवरही धोनीचा ७ हाच क्रमांक दिसला. धोनीचं मजबूत आणि व्हिंटेज कारवरील प्रेमही लपलेलं नाही. आता धोनी चालवत असलेली मर्सिडिज जी वर्गातील गाडीही धोनीच्या आवडीला साजेशीच आहे. (MS Dhoni)

क्रिकेटच्या मैदानात धोनीने २०२४ चा आयपीएल हंगाम खेळणार असल्याचं जाहीर केलंय आणि चेन्नई संघाचं तो नेतृत्वही करणार आहे. (MS Dhoni)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.