Rahul Dravid Contract Extension : राहुल द्रविड यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ मिळाली कशी?

आधी समोर आलेल्या एका चर्चेनुसार, बीसीसीआयला नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून दुसराच एक माजी खेळाडू हवा होता. पण, मग द्रविड आणि त्यांच्या आधीच्याच चमूला मुदतवाढ कशी मिळाली?

162
Rahul Dravid Contract Extension : राहुल द्रविड यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ मिळाली कशी?
Rahul Dravid Contract Extension : राहुल द्रविड यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ मिळाली कशी?
  • ऋजुता लुकतुके

आधी समोर आलेल्या एका चर्चेनुसार, बीसीसीआयला नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून दुसराच एक माजी खेळाडू हवा होता. पण, मग द्रविड आणि त्यांच्या आधीच्याच चमूला मुदतवाढ कशी मिळाली? (Rahul Dravid Contract Extension)

बीसीसीआयने बुधवारी २९ नोव्हेंबरला भारतीय वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा राहुल द्रविड यांच्या नावावर मोहोर उमटवली. त्यांच्या बरोबरच पारस म्हांब्रे, विक्रम राठोड आणि टी दिलिप या इतर प्रशिक्षकांच्या फळीलाही मान्यता देण्यात आली. या सर्वांच्या नवीन कराराची मुदत जाहीर झाली नसली तरी बीसीसीआयने सध्या पुढील वर्षी होणारी वर्ल्ड टी-२० स्पर्धा डोळ्यासमोर धरली आहे हे उघड आहे. (Rahul Dravid Contract Extension)

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी काही दिवस आधी ही महत्त्वाची घोषणा झाली आहे. पण, या घोषणेपूर्वी दोन प्रकारच्या चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्या होत्या. एक म्हणजे राहुल द्रविड यांच्या जागी व्ही व्ही एस लक्ष्मण यांची वर्णी लागण्याची शक्यता आणि दुसरी वर्ल्ड टी-२० स्पर्धेसाठी आशीष नेहराची प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याची शक्यता. (Rahul Dravid Contract Extension)

ही दोन नावं प्रामुख्याने समोर येत होती. आशीष नेहराला तर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी पाचारणही केल्याची बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली होती. पण, नेहराने इतर जबाबदाऱ्यांमुळे प्रशिक्षक होण्याचं टाळलं. (Rahul Dravid Contract Extension)

मग द्रविड यांच्या नावावर नेमकं शिक्कामोर्तब कधी झालं? (Rahul Dravid Contract Extension)

बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी सुरू केली तेव्हा व्ही व्ही एस लक्ष्मणकडे व्हिसासाठी पासपोर्टही मागितला होता. पण, तेव्हाच लक्ष्मण यांनी कुटुंबीयांबरोबर जास्त वेळ घालवायचा असल्याचं कारण देत आपण फारसे उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. (Rahul Dravid Contract Extension)

दुसरीकडे द्रविडही अडीच वर्षांच्या व्यस्त कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा या जबाबदारीसाठी तयार नव्हते. (Rahul Dravid Contract Extension)

पण, द्रविड यांच्या हाताखाली जमून आलेला भारतीय संघ, संघामध्ये तयार झालेली बांधिलकी या गोष्टी बीसीसीआयला तोडायच्या नव्हत्या. त्यामुळे संघाबरोबर मागची काही वर्षं काम केलेल्या द्रविड आणि लक्ष्मण यांच्या भोवतीच बीसीसीआयचे अधिकारी घोटाळत होते. (Rahul Dravid Contract Extension)

अखेर काही महिन्यांत असलेल्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेपर्यंत प्रशिक्षकपदी कायम राहण्यासाठी त्यांनी द्रविड यांना तयार केलं. (Rahul Dravid Contract Extension)

New Project 2023 11 30T170225.530

तीनही प्रकारात राहुल द्रविड यांची यशाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि ही गोष्ट त्यांच्याबाजूने होती. त्यामुळेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी द्रविड यांची नियुक्ती करताना ते द्रविड यांच्या विषयी आग्रही का होते हे सांगितलं.

(हेही वाचा – Vasundhara Raje : वसुंधरा राजेंची मुख्यमंत्री पदासाठी रणनिती तयार)

‘भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी राहुल द्रविड यांच्यासारखा योग्य उमेदवार नाही, असं मी पहिल्यांदा त्यांची नियुक्ती करताना म्हटलं होतं आणि त्यांनी ते सिद्ध केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीनही प्रकारात एक अव्वल संघ बनला आहे आणि आताही संघासाठी जे उद्दिष्टं आम्ही निश्चित केलं आहे, तिथपर्यंत संघाला पोहोचवण्यासाठी राहुल द्रविड यांच्यासारखी योग्य व्यक्ती नाही,’ असं जय शाह बुधवारी निवड जाहीर करताना म्हणाले होते. (Rahul Dravid Contract Extension)

राहुल द्रविड यांच्या नियुक्तीची नवीन मुदत जाहीर झाली नसली तरी वर्ल्ड टी-२० पर्यंत ते या पदावर राहणार हे सध्या निश्चित आहे. त्यानंतर भारतीय संघ पुढील एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करणार आहे. (Rahul Dravid Contract Extension)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.