म्यानमारचे (Myanmar) राजकीय वातावरण अत्यंत विस्फोटक बनले असून लवकरच त्याचे तुकडे होऊ शकतात. (Myanmar China Conflict) हे स्वत: म्यानमारच्या राष्ट्रपतींनीही मान्य केले आहे. गेल्या २ वर्षांपासून तेथील विद्रोही गट आणि सैन्य यांच्यात संघर्ष चालू आहे. म्यानमारच्या मोठ्या भूभागावर विद्रोही गटांनी नियंत्रण मिळवले आहे.
(हेही वाचा – MLA Disqualification Case : ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येते का; काय म्हणाले सुनील प्रभु)
या गटांनी भारत-म्यानमार (India–Myanmar Relations) यांना जोडणारा दोनपैकी एक रस्ताही कह्यात घेतला असून ते भारतासाठी धोक्याचे असल्याचे मानले जात आहे. या विद्रोही गटांना चीनची फूस आहे. चीनने नेहमीच या गटांचे समर्थन केले असून म्यानमारवर स्वत:चा प्रभाव पाडण्याचा त्याचा वाढता प्रयत्न आहे. सशस्त्र विद्रोही गटांमध्ये ‘थ्री ब्रदरहुड अलायंस’ (Three Brotherhood Alliance) हा गट आघाडीवर असून त्याला चीनचे समर्थन प्राप्त आहे.
तर भारताला बसणार फटका…
उद्या जर विद्रोही गटांनी म्यानमारमध्ये सध्या असलेल्या सैन्य सरकारला उलथवून टाकले, तर या गटांच्या माध्यमातून चीनचे म्यानमारवर वर्चस्व प्रस्थापित होईल. त्याचा फटका थेट भारताला बसणार असून पूर्वोत्तर भारताच्या (Northeast India) सुरक्षिततेला ही परिस्थिती अत्यंत मारक ठरेल, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY) : गरिबांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या योजनेला ५ वर्षं मुदतवाढ)
चीनची सीमेवर तयारी चालू
विद्रोही गटांनी चीनशी लागून असलेल्या सीमेवरही नियंत्रण मिळवले आहे. अशातच चीनने स्वत:च्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाचे कारण देत सीमेवर तयारी चालू केली आहे. यासाठी चीनने मोठ्या तोफा आणि रडार यांची नियुक्तीही केली आहे. ही माहिती चिनी सरकारचे वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’नेच (Global Times) दिली.
म्यानमार संघर्ष भारतासाठी धोका
‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’चे प्रा. अविनाश पालीवाल यांनी या परिस्थितीविषयी सांगितले की, म्यानमारचे तुकडे होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. चीनचा सैन्याभ्यास त्याच्या सीमेचे रक्षण करण्यापुरते मर्यादित नाही. म्यानमारवर चीनचा हा वाढता प्रभाव भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्रासाठी धोक्याची घंटी आहे. पूर्वोत्तर भारत आधीपासूनच उग्रवादी आणि जातीय हिंसा यांच्यामुळे होरपळला आहे. (Myanmar China Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community