Israel Hamas War : इस्रायलला मोठा धक्का; जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचे जगभर पडसाद उमटले. त्यानंतर शस्त्रविरामाला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असतानाच धार्मिक क्षेत्र असलेल्या जेरुसलेमच्या रस्त्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

318
Israel Hamas War : इस्रायलला मोठा धक्का; जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला
Israel Hamas War : इस्रायलला मोठा धक्का; जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचे जगभर पडसाद उमटले. (Israel Hamas War) त्यानंतर शस्त्रविरामाला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असतानाच धार्मिक क्षेत्र असलेल्या जेरुसलेमच्या (Jerusalem) रस्त्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये इस्रायलचे ३ नागरिक ठार झाले.

इस्रायल आणि हमासदरम्यान चालू असलेले युद्ध तात्पुरते थांबले आहे. इस्रायल सरकार (Israel) आणि हमासदरम्यान ओलीस आणि कैद्यांच्या सुटकेसाठी शस्त्रविराम (Armistice) घोषित केला आहे. हा शस्त्रविराम वाढण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न होत आहेत. नियोजित करारानुसार हा शस्त्रविराम सोमवारी संपुष्टात येणार होता. त्याला आधी दोन आणि नंतर एक दिवसाची मुदतवाढ मिळाली.

(हेही वाचा – Ravindra Chavan : ठाणे व कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाची दर्जोन्नती; रविंद्र चव्हाण यांचा निर्णय)

रहदारी असलेल्या रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार

अद्याप हमासच्या ताब्यातील सर्व ओलिसांची सुटका झालेली नाही, त्याचबरोबर इस्रायलच्या ताब्यात बरेच पॅलेस्टिनी (palestine) कैदी आहेत. त्यांच्या सुटकेसाठी शस्त्रविराम वाढवण्यात आला आहे. अशातच दहशतवाद्यांनी इस्रायलला मोठा धक्का दिला आहे.

इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात शस्त्रविराम चालू असताना इस्रायलच्या जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. २ हल्लेखोरांनी जेरुसलेमधील रहदारी असलेल्या एका रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ३ इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी ७.४० वाजता हा हल्ला झाला.

विजमन स्ट्रीटवरील बस स्टॉपजवळ दोन पॅलेस्टिनी हल्लेखोर एका गाडीतून उतरले आणि त्यांनी रस्त्यावरच्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिक जागीच ठार झाले आहेत. आठ जण जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Ravindra Chavan : ठाणे व कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाची दर्जोन्नती; रविंद्र चव्हाण यांचा निर्णय)

दोन्ही हल्लेखोरांना कंठस्नान

हल्लेखोर अंदाधुंद गोळीबार करत असताना विजमन स्ट्रीटवर उभ्या असलेल्या ऑफ ड्युटी जवानांनी आणि नागरिकांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही हल्लेखोर मारले गेले. इस्रायली सुरक्षा एजन्सी शिन बेतने दिलेल्या माहितीनुसार मुराद नाम्र आणि इब्राहिम नाम्र अशी हल्लेखोरांची नावे आहेत. हे दोन्ही हल्लेखोर हमासशी संबंधित आहेत. दहशतवादी कारवायांमधील सहभागामुळे या दोघांनी यापूर्वी तुरुंगवास भोगला आहे.

दरम्यान, या हल्ल्याच्या काही वेळ आधी इस्रायलमधल्या जेरुसलेम शहरातील ओल्ड सिटीमधील पवित्र धार्मिक स्थळावर तीन दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस चकमकीत तिन्ही दहशतवादी ठार झाले. (Israel Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.