Mumbai : चेंबूरमधील हॉटेल ईस्टर्न प्लाझावर महानगरपालिकेचा हातोडा

बई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील अग्निशमनविषयक उपाययोजनांची पाहणी केल्यानंतर हॉटेल मालकावर नोटीस बजावली होती. त्यानुसार महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर  कारवाई केली.

160
Mumbai : चेंबूरमधील हॉटेल ईस्टर्न प्लाझावर महानगरपालिकेचा हातोडा
Mumbai : चेंबूरमधील हॉटेल ईस्टर्न प्लाझावर महानगरपालिकेचा हातोडा

चेंबूर येथील वत्सलाताई नाईक नगरमधील हॉटेल ईस्टर्न प्लाझामध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवून जमीनदोस्त केले.नेहरू नगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेऊन ‘एम’ पश्चिम विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. (Mumbai)

पूर्व द्रुतगती मार्गाजवळील वत्सलाताई नाईक नगरमधील दुमजली ईस्टर्न प्लाझा हॉटेलमध्ये कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता एसी शीट फूफ, बीएम वॉल, लादी कोबा स्लॅबचा वापर करून १४ फुटांहून अधिक उंचीचे अनधिकृत लॉजचे बांधकाम करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील अग्निशमनविषयक उपाययोजनांची पाहणी केल्यानंतर हॉटेल मालकावर नोटीस बजावली होती. त्यानुसार महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर  कारवाई केली. (Mumbai )

(हेही वाचा :Israel Hamas War : इस्रायलला मोठा धक्का; जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला)

हॉटेल ईस्टर्न प्लाझा इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सुमारे ८० टक्के बांधकाम पाडण्यात आले. सायंकाळी काळोखामुळे थांबवण्यात आलेली उर्वरित कारवाई ३० नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आली.मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त हर्षद काळे आणि सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ‘एम’ पश्चिम विभागातील कामगार आणि अधिकारी मिळून ३० मनुष्यबळ, तसेच अन्य आवश्यक संसाधनांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. नेहरू नगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.