Mumbai weather: मुंबईत पसरली धुक्याची चादर; थंडीची चाहूल, वातवरणात गारवा

108
Mumbai weather: मुंबईत पसरली धुक्याची चादर; थंडीची चाहूल, वातवरणात गारवा
Mumbai weather: मुंबईत पसरली धुक्याची चादर; थंडीची चाहूल, वातवरणात गारवा

हवेचा स्तर समाधानकारक असल्याने मुंबईकरांची प्रदूषणातून (Mumbai weather) सुटका झाली. थंडीची चाहूल लागल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. यामुळे मुंबईकरांची उन्हाच्या काहिलीतून सुटका झाली.

मुंबईचे कमाल तापमान ३० अंशापर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तापदायक ठरलेली उष्णता कमी झाली आहे, तर किमान तापमान २२ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे रात्री थंडावा, तर दिवसा जाणवणारा उकाडा सध्या जाणवत नसल्याचे आढळले आहे.

(हेही वाचा – Kaka Kalelkar : हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्यासाठी धडपडणारे काका कालेलकर )

पुढील २४ तासांत आकाश ढगाळ राहणार असून कमान आणि किमान तापमानात घट होऊन ते अनुक्रमे २८ आणि २० अंशापर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. गारव्यामुळे हवेतील आर्द्रता ही ५० ते ६० टक्क्यांपर्यंत कमी झाली असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवेचा स्तर…

मुंबईत ९४ एक्यूआयची नोंद झाली. वरळी ५३, भांडुप ७७, अंधेरी ८१, मालाड ८३, बोरिवली १०० एक्यूआयची नोंद झाली. कुलाबा १०१, माझगाव ११०, बीकेसी १४० एक्यूआयसह हवेचा स्तर मध्यम नोंदवण्यात आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.