First QR Code Chowk: गिरगावात पहिला क्यू आर कोड चौक, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

ग्रॅंड रोड येथील गावदेवी परिसरातील ह्युजेस मार्गावर हा चौक तयार करण्यात आला आहे.

158
First QR Code Chowk: गिरगावात पहिला क्यू आर कोड चौक, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
First QR Code Chowk: गिरगावात पहिला क्यू आर कोड चौक, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईमध्ये पहिल्यांदाच क्यू आर कोड चौक (First QR Code Chowk) तयार करण्यात आला असून सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांचे नाव या चौकाला देण्यात आले आहे. ग्रॅंड रोड येथील गावदेवी परिसरातील ह्युजेस मार्गावर हा चौक तयार करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा चौक उभारण्यात आला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ५ दशकांपेक्षा जास्त काळ ज्यांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके. नम्रता आणि कणखरपणा हे त्यांचे वेगळेपण होते. त्यांचे नाव या चौकाला देण्यात आले ही आनंदाची गोष्ट आहे. मंगलप्रभात लोढा मंत्री झाले, तेव्हापासून त्यांनी मुंबई आणि मराठी माणसासाठी काम केलं. या चौकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हे त्याचेच उदाहरण आहे. प्रखर राष्ट्रवाद बाबुजींमध्ये होता. मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी केली.

क्यू आर कोड चौकाचे वैशिष्ट्य –
– कलाकार, महापुरुषांचे, थोर संतांचे, विचारवंतांचे अनेक चौक आणि पुतळे उभारले जातात, शहरात येणाऱ्या पर्यटकांना अथवा स्थानिकांना त्यांच्याबाबत योग्य माहिती त्वरित मिळावी.
– क्यूआर कोड या नव्या संकल्पनेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले आहे.
– येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा स्थानिकांना एका शिलेमध्ये कोरलेला क्यूआर कोड स्कॅन करून सुधीर फडके यांच्या जीवनकार्याची माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे.

‘हे’ वैभव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे…
खरे नायक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न सातत्याने चालला आहे हे बाबूजींना लक्षात आले. त्यांनी स्वतःचे सर्वस्व पणाला लावत वीर सावरकर यांची प्रत्येक गोष्ट जनतेसमोर यावी यासाठी चित्रपट केला. यासाठी बाबूजींना खूप कष्ट करावे लागले. बाबूजी मंतरलेल्या पिढीचे सर्वस्व होते. गीत रामायणाने बाबूजी अजरामर झाले. गीत रामायणाची रचना बाबूजींनी केली. गीत रामायण कधीही ऐकलं तरी त्याचा गोडवा तसाच आहे. कुठलंही तंत्रज्ञान नसताना त्यांनी रामायण उभं केलं. आजही आपल्या समोर चित्र उभे करतात. अशी व्यक्तिमत्त्व असतात त्यांना आपल्या मनात जपायचं असतं. बाबुजींनी तयार केलेलं वैभव आहे ते पुढच्या पिढीला पोहोचलं पाहिजं म्हणून आपण असे चौक तयार केले आहेत, असे या कार्यक्रमानिमित्त फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.