एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ (IND vs AUS 4th T20) आता त्यांच्या पुढच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यामध्ये एकूण ५ टी – २० सामन्यांची मालिका सुरु असून पहिल्या दोन सामन्यांवर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केला आहे.
अशातच आज म्हणजेच शुक्रवार १ डिसेंबर रोजी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th T20) चौथा टी २० सामना खेळणार आहे. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर येथे हा सामना खेळला जाणार आहे.
(हेही वाचा – Assembly Election Exit Poll 2023 : राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का?)
पहिले दोन्ही सामने भारताने आणि एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे आज भारतीय (IND vs AUS 4th T20) संघ मालिका विजयाचे लक्ष्य ठेऊनच मैदानात उतरेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील युवा टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
Raipur Ready 👌👌#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/AlftSoHIuj
— BCCI (@BCCI) November 30, 2023
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ :
ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, आरोन हार्डी, बेन मॅकडरमॉट, मॅथ्यू वेड (कर्णधार), टिम डेव्हिड, ख्रिस ग्रीन, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा
हेही पहा –
Join Our WhatsApp Community