इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या लावण्याच्या दुकानदारांना दिलेल्या सूचनांचे नाशिक (nashik) शहरात पालन होत नसल्याची बाब समोर आल्यानंतर आयुक्त अशोक करंजकर (Commissioner Ashok Karanjkar) यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडून दोन दिवसातील कारवाईचा अहवाल मागितला आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार, राज्यात दुकानांच्या पाट्या मराठीत करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यासाठी २५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. तातडीने इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या लावण्याच्या सूचना दिल्या, मात्र त्यानंतरही दोन दिवसांत कुठलीही कारवाई झाली नाही. कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, तसेच विभागीय अधिकाऱ्यांची १ डिसेंबरला महापालिका मुख्यालयात बैठक बोलाविली आहे, अशी माहिती कर उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.
(हेही वाचा – IND vs AUS 4th T20 : भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य!)
अधिकाऱ्यांना नोटिसा…
नाशिक शहरांमध्ये जवळपास ५३ हजार खासगी आस्थापनांमध्ये इंग्रजी पाट्यांचे रुपांतर मराठीत करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्या होत्या. त्यानंतर लोकांवर कारवाई केली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही इंग्रजी पाट्या जसाच्या तशा असल्याने मंगळवारपासून दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. विभागीय अधिकाऱ्यांनीदेखील कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही.
दोन दिवसांत मराठी पाट्या लावण्याबाबत कारवाई…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दोन दिवसात मराठी पाट्या लावण्यासाठी काय कारवाई केली, याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे.
हेही वाचा –