ऋजुता लुकतुके
एकदविसीय आणि टी-२० मालिकांचा कार्यक्रम थकवणारा असतो. एक सामना संपला की लगेच पुढील सामन्यासाठी बाडबिस्तरा आवरून निघावं लागतं. आताची भारती आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची मालिकाही त्याचसाठी खेळाडूंची कसोटी पाहणारी आहे. त्यातच भारतातील उकाड्यात हे सामने होत आहेत.
(हेही वाचा-Central Railway: मध्य रेल्वेवर रात्रकालिन ‘ब्लॉक’, ‘या’ लोकल गाड्या रद्द होणार)
मालिकेतील तिसरा गुवाहाटीचा सामना गमावल्यानंतरही भारतीय संघाचा मूड अगदी शांतच आहे. आणि चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा निर्धार भारतीय संघाने केलाय. संघाचं रायपूरमध्ये आगमन झालं तेव्हा खेळाडू उत्साहात होते. चाहत्यांनी विमानतळ आणि हॉटेलबाहेरही गर्दी केली होती.
आणि खेळाडूंचा उत्साहही वाखाणण्यासारखा होता. बीसीसीआयने खेळाडू गुवाहाटीहून निघाले आणि रायपूरला पोहोचले त्या क्षणांचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे.
Guwahati ✈️ Raipur#TeamIndia are here for the 4️⃣th #INDvAUS T20I 👌🏻👌🏻@IDFCFIRSTBank pic.twitter.com/kotB4o8vll
— BCCI (@BCCI) November 29, 2023
सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर तिसऱ्या सामन्यांत मात्र २३५ धावा करूनही त्यांचा पराभव झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या ४८ चेंडूंत १०४ धावांच्या नाबाद खेळीमुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि मालिकेत पुनरागमन केलं.
आता उर्वरित दोन टी-२० सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघात परतला आहे. त्यामुळे भारतीय मधली फळी मजबूत झाली आहे. मालिकेतील चौथा सामना शहीद वीरनारायण सिंग मैदानात रायपूरला १ डिसेंबरला होणार आहे. तर शेवटचा सामना रविवारी ३ डिसेंबरला बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.
Join Our WhatsApp Community