‘मंगळ’ ग्रहावर अनेक वर्षांपासून जीवसृष्टी असल्याचे संकेत मिळतात का, याविषयी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. पृथ्वीच्या शेजारी असणाऱ्या या ग्रहावर नासाचे (NASA) अनेक रोव्हर सध्या वावरत आहेत. ब्रिटनच्या वेल्समध्ये तयार झालेले एक वैज्ञानिक उपकरण मंगळावरील जीवसृष्टीचा छडा लावणार आहे.
या उपकरणाचे नाव ‘एन्फिस’ आहे. या शब्दाचा अर्थ ‘इंद्रधनुष्य’ असा होतो. हे एक इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर असून ते आबेरीस्टविच युनिव्हर्सिटीत विकसित केले जात आहे. ते युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोजलिंड फ्रॅकलिन रोव्हरमध्ये बसवले जाणार आहे. हे ६ चाकांचे रोव्हर २०२८मध्ये मंगळाकडे पाठवले जाईल. हे उपकरण रोव्हरच्या अतिरिक्त कॅमेरा सिस्टिममध्ये बसवले जाईल. ते मंगळावरील वैशिष्ट्यपूर्ण दगड हेरून त्यामध्ये ड्रील करण्यास सुचवेल, जेणेकरून या चाचणीतून प्राचीन काळातील जीवसृष्टीचे पुरावे मिळतील.
(हेही वाचा – Mumbai Police : पोलीस बोर्ड लावून कार मधून गुटख्याची तस्करी, पोलिस हवालदार निलंबित)
हे उपकरण बनवण्याचा खर्च १३.४ दशलक्ष डॉलर्स इतका आहे. या नव्या उपकरणात असे सेन्सर्स आहेत ज्यांच्या साहाय्याने मंगळभूमीची टेहळणी करून ड्रीलिंग आणि चाचण्यांसाठी योग्य खडकांची निवड केली जाईल.