ऋजुता लुकतुके
नामिबिया पाठोपाठ युगांडाच्या क्रिकेट संघानेही इतिहास रचताना वर्ल्ड टी-२० स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. आफ्रिका खंडातील पात्रता स्पर्धा आता पार पडली आहे. आणि केनिया, रवांडा तसंच झिंबाब्वे संघांना मागे टाकून या दोन संघांनी आगेकूच केली आहे.
(हेही वाचा-Ajit Pawar : बारामती, सातारा, रायगड, आणि शिरूरच्या जागा लढवणारच)
युगांडाने आफ्रिका स्तरावरील स्पर्धेत सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. रविवारी त्यांनी झिंबाब्वे संघाचा पराभव करताना पहिल्यांदाच आयसीसीच्या सदस्य देशाला हरवण्याची किमया केली आणि गुरुवारी रवांडा संघाचा ९ गडी राखून पराभव करत त्यांनी वर्ल्ड टी-२०साठी पात्रताही मिळवली.
🚨 Uganda create history 🚨
They have qualified for the #T20WorldCup 2024 and will become only the fifth African nation to feature in the tournament 🔥
Details 👉 https://t.co/TgLrh9MBxw pic.twitter.com/yxMyyTMd4K
— ICC (@ICC) November 30, 2023
रवांडा विरुद्ध खेळताना युगांडाने आधी प्रतिस्पर्धी संघाला ६५ धावांतच गुंडाळलं आणि मग ही धावसंख्या नवव्या षटकांत एक गडी गमावून गाठली. आयसीसी मान्यतापात्र स्पर्धा खेळण्याची युगांडाची ही पहिलीच खेप असेल. दुसरीकडे झिंबाब्वे सारख्या कसोटी दर्जा मिळवलेल्या संघाला मात्र यंदा एकदिवसीय विश्वचषक आणि मागोमाग टी-२० चषकातही अंतिम स्पर्धेत स्थान मिळवता आलेलं नाही.
१९९८ पासून युगांडा क्रिकेट बोर्ड हा आयसीसीचा असोसिएट सदस्य आहे. पण, त्यांना एकदिवसीय तसंच कसोटी मान्यता नाही. आता युगांडा समावेश जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेत झाला आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ खेळणार आहेत.
Presenting the 2⃣0⃣ teams that will battle for ICC Men’s #T20WorldCup 2024 🏆
✍: https://t.co/9E00AzjcRN pic.twitter.com/1nu50LOLWQ
— ICC (@ICC) November 30, 2023
नामिबिया आणि युगांडा आफ्रिका खंडातून तर ओमान आणि नेपाळ आशिया खंडातून तसंच पापुआ न्यू गिनी हे ऑस्ट्रेलिया खंडातून आणि कॅनडा अमेरिका खंडातून या स्पर्धेत खेळणार आहेत. अमेरिकेचा संघ यजमान म्हणून स्पर्धेत खेळेल.
Join Our WhatsApp Community