महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) वाहतूक धिम्या गतीने होत आहे. सुट्ट्यांमुळे सकाळपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंद गतीने होत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग हा पुणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर काल रात्रीपासून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहने मंद गतीने सुरू होती. महामार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडीमुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलीस दहा दहा मिनिटांच्या ब्लॉक घेऊन पुण्याकडे येणारी वाहतूक दोन्ही मार्गांवरून सोडत आहेत. तसेच पुढील काही वेळात ही वाहतूक कोंडी सुटेल, अशी पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Communityयशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे वरुन मुंबई ते पुणे हा प्रवास करीत असताना घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. यापुर्वी हा रस्ता प्रवासासाठी अतिशय उत्तम असा होता. परंतु अलिकडे या रस्त्याने प्रवास करताना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.यात वेळ, पेट्रोल-डिझेल वाया तर जातेच… pic.twitter.com/QMFzcHPy13
— Supriya Sule (@supriya_sule) November 27, 2023