कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील १५ शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी शाळांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बसवेश्वनगरच्या नेपेल आणि विद्याशिल्पासह ७ शाळा आणि येलहंका परिसरातील अनेक खासगी शाळांना धमकीचे ईमेल आले आहेत.
‘शाळा बॉम्बने उडवून देऊ, असा उल्लेख या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे.’ त्यानंतर तब्बल ५ हजार मुलांना तातडीने घरी पाठवण्यात आले. धमकीचे ईमेल आलेल्या शाळांमध्ये पोहोचून पोलिसांनी तिथल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि शाळा रिकाम्या केल्या. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानाजवळील एका प्ले स्कूललादेखील बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली आहे.
(हेही वाचा – National OBC Women’s Federation : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे दुसरे अधिवेशन नागपूरला )
तपासणीत अद्याप काहीच हाती लागले नाही…
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब निकामी करणारी पथकं शाळांमध्ये पोहोचली असल्याची माहिती बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात येत असल्याचा मेसेज धमकी आलेल्या शाळांपैकी एका शाळेने पालकांना पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पालकांना ही गोष्ट कळल्यानंतर काळजीपोटी पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली. मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी पालक शाळेच्या गेटवर पोहोचले. बॉम्ब स्कॉड्सने शाळांची झडती घेण्यास सुरुवात केली, मात्र या तपासणीत अद्याप काहीच हाती लागले नसल्याचे पोलीस आयुक्त दयानंद यांनी सांगितले. पोलीस धमकी दिलेल्या शाळांची तापसणी करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीही अशा प्रकारे धमकीचे ईमेल येत होते. त्याही अफवा होत्या, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
हेही पहा –