पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवार, ३० नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दुबईला पोहोचले. दुबईतील भारतीय समुदायाने त्यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदी तेथे जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत (COP28 Summit) सहभागी होणार आहेत.
दुबईत मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. या वेळी भारतीय समुदायाने (Indians In Dubai) ‘भारत माता की जय’ आणि ‘वन्दे मातरम’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘सारे जहाँ से अच्छा’ गाऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दुबईला पोहोचल्यानंतर मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.
(हेही वाचा – Assembly Elections : देशात मोदी मॅजिक कायम!)
Landed in Dubai to take part in the COP-28 Summit. Looking forward to the proceedings of the Summit, which are aimed at creating a better planet. pic.twitter.com/jnHVDwtSeZ
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2023
भारतीय समुदायाचे कौतुक
“COP-28 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी दुबईला पोहोचलो आहे. शिखर परिषदेची वाट पाहत आहे.” यासोबतच दुबईत भारतीय समुदायाने केलेल्या स्वागताचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
ते म्हणाले की, भारतीय समुदायाचा पाठिंबा आणि उत्साह हा आपल्या संस्कृतीचा आणि दृढ संबंधांचा पुरावा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. (PM Modi Dubai Visit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community