CM Eknath Shinde : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू

127
CM Eknath Shinde : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
CM Eknath Shinde : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्याच्या विविध भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Bengaluru Threat Emails: बंगळुरूमध्ये १५ शाळांना धमकीचे ई-मेल; पोलिसांकडून तपास सुरू)

त्यानुसार राज्यात नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. २ हेक्टर ते ३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून पिकांच्या प्राप्त नुकसानीचे अहवाल एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)

खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर स्वागत केले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.