Mumbai Swachhata : मुंबईतील स्वच्छता आता ‘मायक्रो’स्तरावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व जाणून संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीमेला सुरुवात केली आहे.

584
Mumbai Swachhata : मुंबईतील स्वच्छता आता ‘मायक्रो’स्तरावर
Mumbai Swachhata : मुंबईतील स्वच्छता आता ‘मायक्रो’स्तरावर

मुंबईत डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या दोन महिन्‍यातील प्रत्‍येक शनिवारी परिमंडळातील एक प्रभाग निवडून व्‍यापक स्‍तरावर व सूक्ष्‍म पातळीवर (Micro level) संपूर्ण स्‍वच्‍छता (Deep cleaning) केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून याचा या मोहिमेचा शुभारंभ येत्या रविवारी जी उत्तर विभागातील धारावी आणि डि विभागात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. (Mumbai Swachhata)

रस्‍ते-पदपथ धूळमुक्‍त करण्‍याबरोबरच बेवारस वाहनांची विल्‍हेवाट…

स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात व्‍यापक स्‍तरावर संपूर्ण स्‍वच्‍छता (Deep cleaning) मोहीम राबविण्‍याचे नियोजन केले आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत रस्‍ते-पदपथ धूळमुक्‍त करण्‍याबरोबरच बेवारस वाहनांची विल्‍हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्‍वच्‍छता, उद्यान-क्रीडांगणांची निगा, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवाला विरहीत क्षेत्र, राडारोडामुक्‍त परिसर आदी कार्यवाही केली जाणार आहे. या स्‍वच्‍छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह, समाजातील ख्‍यातनाम व्‍यक्‍ती, उद्योजक, ज्‍येष्‍ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्‍था-संघटना आदींना सहभागी केले जाणार आहे. (Mumbai Swachhata)

‘डीप क्लिनिंग’ मोहीम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व जाणून संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीमेला सुरुवात केली आहे. स्‍वच्‍छता मोहिमेस व्यापक लोकचळवळीचे स्‍वरूप प्राप्‍त करण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे असेही आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनांनुसार मुंबईकरांची वायू प्रदूषणापासून सुटका करण्‍यासाठी मुंबई महानगरपालिका प्रभावीपणे विविध उपाययोजना राबवत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी, कामगार रस्‍त्‍यावर उतरुन अहोरात्र कार्यरत आहेत. रस्‍ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी धूळ हटवून पाण्याने धुण्‍याचे काम अखंडपणे सुरू आहे. त्‍याही पुढे जात आता ‘डीप क्लिनिंग’ मोहीम राबविण्‍याचा संकल्‍प महानगरपालिकेने केला असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले. (Mumbai Swachhata)

मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत स्‍वच्‍छता…

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी संपूर्ण मुंबई शहरामध्ये अधिकचे मनुष्‍यबळ वापरून रस्ते स्वच्छ केले जात आहेत. रस्‍त्‍यांवर साचलेली धूळ ब्रशने स्‍वच्‍छ करण्‍यात येत आहे. त्यानंतर रस्ते पाण्याने धुवूण्‍यात येत आहेत. वॉटर फॉगरदवारे पाण्‍याची फवारणी करत हवेतील धूलिकणांवर नियंत्रण आणले जात आहे. मुंबईतील कोळीवाडे, समुद्रकिनारे, वर्दळीचा परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहे दिवसातून चार ते पाच वेळा स्‍वच्‍छ करण्‍याबरोबरच निर्जंतुकीकरण करण्‍याची कामेही सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत स्‍वच्‍छता करण्‍यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी-कामगार सदैव तत्‍पर आहेत.” (Mumbai Swachhata)

कामगार रस्‍त्‍यावर अहोरात्र …

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनांनुसार महानगरपालिकेमार्फतही स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या मार्गदर्शनानुसार आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्‍या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, कामगार रस्‍त्‍यावर उतरुन अहोरात्र कार्यरत आहेत. (Mumbai Swachhata)

बेवारस वाहने हटवण्यासाठी…

डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या दोन महिन्‍यातील प्रत्‍येक शनिवारी परिमंडळातील एक प्रभाग निवडून व्‍यापक स्‍तरावर व सूक्ष्‍म पातळीवर संपूर्ण स्‍वच्‍छता (डीप क्लिनिंग) केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहील. विभागाचे सहाय्यक आयुक्त साप्ताहिक कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रांची नावे निश्चित करतील. शनिवारी सकाळी सामूहिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी त्या भागातील सर्व रस्ते, गल्ल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छता मोहिमेदरम्यान, वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग आवश्यक अतिरिक्त वाहने आणि संयंत्रे पुरवतील. तर अतिक्रमण निर्मुलन विभाग विनापरवाना जाहिरात फलक, पोस्टर्सवर कारवाई करेल आणि परिसरातील बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेईल. (Mumbai Swachhata)

(हेही वाचा – Air Marshal Makarand Ranade : एअर मार्शल मकरंद रानडे हवाई दलाचे नवे महासंचालक)

अस्‍ताव्‍यस्‍त विखुरलेले केबल्‍सचे जंजाळ…

याखेरिज, कचरा अलगीकरणासह सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्‍वच्‍छता, सार्वजनिक उद्याने-स्थानिक उद्यानांची निगा राखणे, मुलांसाठी खेळण्याची साधने असणे व ती सुस्थितीत असणे, शासकीय कर्मचारी निवासस्‍थाने-वसाहतींमध्‍ये सामूहिक स्‍वच्‍छता राबविणे, अस्‍ताव्‍यस्‍त विखुरलेले केबल्‍सचे जंजाळ काढणे यांसह विविध उपाययोजना राबविल्‍या जाणार आहेत. (Mumbai Swachhata)

विविध ठिकाणी व्‍यापक स्‍वच्‍छता…

या मोहिमेची सुरूवात रविवार, ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता जी उत्तर विभागातील धारावी येथून केली जाणार आहे. माननीय मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या प्रमुख्‍य उपस्थितीत या ‘Deep cleaning’ मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे. तसेच याच दिवशी डी विभागात सकाळी १० वाजता मोहीम राबविली जाणार आहे. डी विभागातील झोपडपट्टी व तत्‍सम भाग, उच्‍चभू परिसर, शासकीय कर्मचारी वसाहत यांसह महानगरपालिकेची रूग्‍णालये, वाचनालये, शाळा-महाविद्यालये या विविध ठिकाणी व्‍यापक स्‍वरूपात स्‍वच्‍छता केली जाणार आहे. विविध सयंत्रांच्‍या आणि अतिरिक्‍त मनुष्‍यबळाच्‍या वापराने प्रभाग अधिक स्‍वच्‍छ केला जाणार आहे. या मोहिमेत खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींसह समाजातील ख्‍यातनाम व्‍यक्‍ती, उद्योजक, खेळाडू, ज्‍येष्‍ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्‍था-संघटना आदींना सहभागी केले जाणार आहे, असेही डॉ. सुधाकर शिंदे यांनी नमूद केले. (Mumbai Swachhata)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.