सध्या प्रदूषणावरुन बरीच चर्चा किंवा चिंतेचा सुर ऐकू येतो. सध्या वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण याचा चांगलाच परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. यापासूनच थोडा आराम मिळावा यासाठी आपण काही उपाय करता येईल ते आपण पाहूया. (Pollution Safety Tips)
ध्यानधारणा व प्राणायाम आपले श्वसनतंत्र मजबूत करते
घरच्या बालकनीत शतपावली करा किंवा सोसायटीच्या आवारातच जॉगिंग करा. लॉंग वॉकला जाण्याऐवजी घराच्या आजुबाजूलाच शॉर्ट वॉक करा. योग एक कंप्लीट हेल्थ पॅकेज आहे. कारण यामध्ये प्राणायाम व ध्यानधारणा अशा क्रियांचाही समावेश आहे. योगासनांमुळे आपले शरीर सुदृढ राहते तर ध्यानधारणा व प्राणायाम आपले आंतरिक आरोग्य व श्वसनतंत्र मजबूत करते. तर मेडिटेशन मानसिक आरोग्य फिट ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे जीममध्ये जाण्यापेक्षा, पार्क मध्ये रनिंग व एक्सरसाईज करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच योग करा. एक्सरसाईज, जॉगिंग व नृत्याच्या मदतीनेही तुम्ही फिट राहू शकता. (Pollution Safety Tips)
आहारात करा या फळ भाज्यांचा समावेश
प्रदूषणापासून आरोग्याचा बचाव करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन सी चा समावेश करा. यासाठी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. याऐवजी तुम्ही हिवाळ्यातील फळे जसे की, संत्री, पेरु अशा फळांचे सेवन करा. दिवसातून एकदा संत्र्याचा ज्यूस घेतल्याने प्रदूषणापासून बचाव होईल. ज्या भाज्या डार्क रंगाच्या असतात त्यात अॅंटीऑक्सिडंट तत्व अधिक प्रमाणात असतात. जसं की, रंगीबेरंगी शिमला मिरची! लाल, पिवळ्या, हिरव्या शिमला मिरच्यांची भाजी, सॅलेड व सूप करुन तुम्ही खाऊ शकता. शिवाय आहारात लिंबूचाही वापर करावा.
घशातील खवखव वर ग्रीन टी व भाज्या फायदेशीर
प्रदूषणावर मात करण्यासाठी ग्रीन टी खूपच लाभदायक असते. यासोबत हिरवी कडधान्ये व हिरव्या पालेभाज्या जसं की, मेथी, पालक, कांद्याची पात, ब्रोकोली या भाज्या शरीरावर प्रदूषणाचा परिणाम होऊ देत नाहीत. कारण या भाज्या इम्युनिटी बुस्टर सारखं कार्य करतात. हवेतील प्रदूषणामुळे घशात होणारी खवखव थांबवण्यासाठी गरम पाणी रामबाण उपाय ठरु शकतं. यासोबतच गरम पाण्याची स्टिम घेणंही यापासून सुटका करु शकतं. जेवल्यानंतर गरम पाणी प्यावे. ग्रीन टी किंवा आल्याचा कडक चहा करुन प्यावा. या उपायांनीही आराम पडत नसेल तर ईएनटी स्पेशालिस्ट म्हणजेच कान, नाक, घशाच्या डॉक्टरांची जरुर भेट घ्या.