Mizoram Results Postponed : ख्रिस्त्यांच्या प्रार्थनेसाठी मिझोरामची मतमोजणी पुढे ढकलली

Mizoram Results Postponed : मतमोजणी पुढे ढकलण्याचे कारणही अजब आहे. ख्रिश्चनबहुल मिझोराम राज्यात ख्रिस्त्यांच्या प्रार्थनेसाठी ही मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे.

189
Mizoram Results Postponed : ख्रिस्त्यांच्या प्रार्थनेसाठी मिझोरामची मतमोजणी पुढे ढकलली
Mizoram Results Postponed : ख्रिस्त्यांच्या प्रार्थनेसाठी मिझोरामची मतमोजणी पुढे ढकलली

निवडणूक आयोगाने (election commission of india) मिझोराममधील मतमोजणीच्या तारखेला बदल केला आहे. (Mizoram Results Postponed) त्यामुळे नुकतेच विधानसभा निवडणुका झालेल्या चार राज्यांमध्ये मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे, तर मिझोरममधील निकालाची तारीख बदलून 4 डिसेंबर करण्यात आली आहे. चार राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिझोराममध्ये (Mizoram) मतमोजणी होईल.

(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : परदेशी भाषा प्रशिक्षणासाठी पोलीस पाल्यांना १० टक्के जागा राखीव; मंगलप्रभात लोढा यांची माहिती)

सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा

ही मतमोजणी पुढे ढकलण्याचे कारणही अजब आहे. ख्रिश्चनबहुल मिझोराम राज्यात ख्रिस्त्यांच्या प्रार्थनेसाठी ही मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. मिझोराममध्ये मतदानाआधीच मतमोजणीची तारीख बदलण्याची मागणी होत होती. त्यावर सर्व पक्षांची सहमती होती. रविवार हा ख्रिस्त्यांसाठी पवित्र दिवस समजला जातो. त्यामुळे ख्रिश्चनबहुल मिझोराम राज्यातील मतमोजणीची तारीख बदलण्याची मागणी जोर धरत होती. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला होता. (christians in mizoram)

मिझोराममध्ये रविवारी कोणताही अधिकृत कार्यक्रम नाही

सर्व राजकीय पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्यासाठी पत्र लिहिले होते. या पत्रात असे म्हटले आहे की, ”मिझोराममधील ख्रिस्ती लोक रविवारी प्रार्थना करतात. त्यामुळे मिझोराममध्ये रविवारी कोणताही अधिकृत कार्यक्रम आयोजित केला जात नाही.” या पत्रावर सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वाक्षरी होत्या.

निवडणूक आयोगाकडे याचिका पाठवणाऱ्या पक्षांमध्ये सत्ताधारी एमएनएफ (MNF), भाजप (BJP), काँग्रेस, झोराम पीपल्स मुव्हमेंट आणि पीपल्स कॉन्फरन्स यांचा समावेश होता.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : अनिल देसाई यांनी पाठवलेले पत्र रेकॉर्डवर आणा; ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र)

40 सदस्यांच्या मिझोराम विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. पहिल्या पाच राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार होती. आता मिझोरामची मतमोजणी सोमवारी होईल.

एक्झिट पोल काय सांगतात ?

मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा 4 डिसेंबर रोजी संपेल, परंतु त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलचे अंदाज झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेड.पी. एम.) सरकारला जनादेश दर्शवतात. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया या एक्झिट पोलमध्ये मिझोरम विधानसभेच्या 40 जागांपैकी झेडपीएमला 49 टक्के मतांसह 28-35 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मिझोराम विधानसभेत बहुमताचा आकडा 21 आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.