Central Railway : दाट धुक्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वे च्या वाहतुकीचा वेग मंदावला

इतर विभागातून मुंबई उपनगरीय मार्गावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिल्याने अनेक लोकल बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या होत्या. तसेच अनेक लोकल उशिराने धावत होत्या.

179
Central Railway : दाट धुक्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वे च्या वाहतुकीचा वेग मंदावला
Central Railway : दाट धुक्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वे च्या वाहतुकीचा वेग मंदावला

शुक्रवारी, शनिवारी पहाटे धुक्यामुळे मध्य रेल्वे व पश्चिम मार्गावरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, त्याचा फटका नोकरदार, व्यावसायिकांना बसला. (Central Railway )

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ विभागात पहाटे दाट धुके पडल्याने दृश्यमानता कमी झाल्यामुळे मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वेमार्ग दिसणे अवघड झाले होते. त्यामुळे मुंबईसह इतर सर्व विभागांतील रेल्वे कमी वेगाने धावत होत्या. तर, मुंबई महानगरातील लोकल पहाटेपासून ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारी २ वाजतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ होती. इतर विभागातून मुंबई उपनगरीय मार्गावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिल्याने अनेक लोकल बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या होत्या. तसेच अनेक लोकल उशिराने धावत होत्या.पहाटेच्या धुक्यामुळे १० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या’, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. अनियमित वेळेने लोकल धावत असल्याने कल्याण, डोंबिवली फलाटांवर येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती. (Central Railway)

(हेही वाचा :Water Cut : शनिवार आणि रविवारी उपनगरातील काही भागात पाणी बाणी)

या धुक्यामुळे मोटरमनला पाच फुटाच्या पलीकडील काही दिसत नसल्याने दिव्यांच्या प्रखर झोतात मोटारमन हळूहळू लोकल पुढे नेतात. अशा धुक्यात लोकल वेगाने चालविली तर अपघाताची शक्यता असते. धुक्याची चादर तयार झाली की मोटरमन हळूहळू लोकल चालवितात. असेही रेल्वे च्या वतीने सांगण्यात आले.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.