Unseasonal Rain : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा धोका

166
Unseasonal Rain : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडला. त्यामुळे काही शहरात या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आश्वासन दिले आहे.

अशातच आता डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या तापमानावर परिणाम होणार आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बनसमुळे राज्यात पुढील 24 तासांत काही ठिकाणी (Unseasonal Rain) पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

(हेही वाचा – Water Cut : शनिवार आणि रविवारी उपनगरातील काही भागात पाणी बाणी)

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट (Unseasonal Rain) आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा धोका

दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा (Cyclone Michaung) धोका आहे. मात्र, हे संभाव्य वादळ देशाच्या दक्षिण भागात धडकणार आहे. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. चक्रीवादळ मिचॉन्ग सोमवारी (२७ नोव्हेंबर) पहाटे पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. उत्तर तामिळनाडू आणि शेजारील दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टी (Unseasonal Rain) जिल्हे सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.