इस्त्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या ५० महिला आणि मुलांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायल सरकारने १५० पॅलेस्टिनी कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यासोबत युद्धाला काही दिवसांचा ब्रेक दिला होता.
या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू (Israel-Hamas War) यांच्या कार्यालयाने सांगितले की, इस्रायल सरकारने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या ५० महिला आणि मुलांची सुटका करण्यासाठी पॅलेस्टिनी हमास दहशतवाद्यांशी केलेल्या कराराला पाठिंबा दिला आहे.
(हेही वाचा – Aditya L1 Update : आदित्य L 1 बाबत इस्रो ने दिली मोठी माहिती ; जाणून घ्या अजून किती लागणार कालावधी)
मात्र युद्धविराम संपल्यानंतर (Israel-Hamas War) युद्धाला पुन्हा सुरुवात होईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी म्हटले होते. त्यानुसार आता इस्रायलमध्ये सुमारे १२०० नागरिक आणि ७७ सैनिक मारले गेले आहेत.
इस्रायलकडून गाझा पट्टीवर पुन्हा हल्ले
आठवडाभराच्या युद्धविरामाची (Israel-Hamas War) मुदत शुक्रवार १ डिसेंबर रोजी संपल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. यात हमासच्या २०० हून अधिक ठिकाणांवर मारा करण्यात असून, १०९ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर शेकडोजण जखमी झाले आहेत.हमास ही दहशतवादी संघटना नष्ट करण्याच्या उद्देशानेच इस्रायलने ही लष्करी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांच्या हालअपेष्टांत आणखी वाढ झाली आहे. दक्षिण गाझातील पॅलेस्टिनी रहिवाशांनी आपली घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी निघून जावे, असे आवाहन करणारी पत्रके इस्रायलच्या विमानांनी या भागात टाकली आहेत. (Israel-Hamas War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community