Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या घोट्यावर मुंबईत उपचार सुरू

मोहम्मद शामीच्या दुखऱ्या घोट्यावर उपचारांची गरज आहे. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी बीसीसीआयला आशा आहे. 

262
Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या घोट्यावर मुंबईत उपचार सुरू
Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या घोट्यावर मुंबईत उपचार सुरू
  • ऋजुता लुकतुके

मोहम्मद शामीच्या दुखऱ्या घोट्यावर उपचारांची गरज आहे. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी बीसीसीआयला आशा आहे. (Mohammed Shami Injury Update)

एकदिवसीय विश्वचषक गाजवणारा मोहम्मद शामीचा पायाचा घोटा सध्या दुखावलाय आणि त्यावर उपचारांची गरज आहे. शुक्रवारीच शामीने या संदर्भात मुंबईतील एका ऑर्थोपेडिक सर्जनची भेटही घेतली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी आशा बीसीसीआयला आहे. म्हणूनच २६ डिसेंबरला सुरू होणाऱ्या या कसोटीसाठीच्या संघात शामीची निवड करण्यात आली आहे. (Mohammed Shami Injury Update)

पण, बीसीसीआयमधील एका सूत्राने ‘शामीची निवड ही अटी आणि शर्तींसह आहे,’ असं स्पष्ट केलं आहे. म्हणजे येत्या १५ दिवसांत खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला तरंच शामीला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात येईल. संघाची निवड जाहीर करतानाच बीसीसीआयने तसं स्पष्ट केलं होतं. (Mohammed Shami Injury Update)

(हेही वाचा – Central Railway Megablock : जाणून घ्या मध्य रेल्वेवर कुठे – कुठे असणार ‘ब्लॉक’)

मोहम्मद शामीच्या घोट्याला नेमकी कुठली दुखापत झालीय हे अजून स्पष्ट नाही. सध्या त्याच्या निदानासाठीच तो मुंबईत आल्याचं बोललं जातंय. या दरम्यान बंगाल संघाचा विजय हजारे चषकातील सामना पाहण्यासाठी तो गुरुवारी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअमवरही आला होता. (Mohammed Shami Injury Update)

सध्या शामी थोडा लंगडत चालतोय आणि त्याच्या दुखापतीचं स्वरुपच अजून उघड झालेलं नाही. पण, मैदानावर खेळताना त्याला दुखापत झालेली नाही. तर अंतर्गत दुखापतीमुळे घोटा दुखावल्याचं बोललं जात आहे. सध्या तरी शामीच्या दुखापतीविषयी नेमकी माहिती मिळालेली नाहीए आणि दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी शामीने तीन दिवसीय प्रदर्शनीय सामन्यातही खेळावं अशी बीसीसीआयची इच्छा आहे. त्यामुळे सध्या तरी मोहम्मद शामी या दुखापतीतून सावरण्यासाठी घड्याळाशी स्पर्धा करताना दिसतोय. (Mohammed Shami Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.