Mumbai Crime : मिर्झापूर टोळीतील दरोडेखोराला मुंबईत अटक

बँक कॅश व्हॅन वर दरोडा टाकून मुंबईत आला होता पळून

196
Mumbai Crime : मिर्झापूर टोळीतील दरोडेखोराला मुंबईत अटक
Mumbai Crime : मिर्झापूर टोळीतील दरोडेखोराला मुंबईत अटक

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे एका बँक कॅश वाहनांवर सशस्त्र दरोडा टाकून मुंबईत पळून आलेल्या मिर्झापूर टोळीतील एका दरोडेखोराला अंधेरी एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली आहे. चंदन कमलेश पासवान (२०) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. चंदन हा या दरोड्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका झोपडपट्टीत लपून बसला होता. (Mumbai Crime)

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्हातील कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ सप्टेंबर रोजी एका टोळीने सशस्त्र दरोडा टाकला होता. ‘रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस लिमिटेड’ या कंपनीची कॅशव्हॅन ही मिर्झापूर येथील अक्सिस बँकेत रोकड जमा करण्यासाठी आली असता. दोन मोटारसायकल वरून आलेल्या ४ हेल्मेटधारी यांनी कॅश व्हॅन व व्हॅनवरील सुरक्षा रक्षकांवर अंधाधुंद गोळीबार करून व्हॅन मधील रोकड लुटून पोबारा करीत असताना व्हॅन वरील कर्मचारी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु या टोळीने पुन्हा अंधाधुंद गोळीबार करीत बँकेच्या रोकड सह पळ काढला. (Mumbai Crime)

या दरोड्याचा घटनेत सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी कटरा पोलीस ठाण्यात, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्र प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कटरा पोलीस ठाणे आणि यूपीएसटीएफ यांच्याकडून या दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत होता. या दरोड्यातील मिर्झापुर टोळीतील एक दरोडेखोर हा अंधेरी एमआयडीसी येथील सनसिटी हॉटेलच्या मागे असलेल्या झोपडपट्टी येथे लपून बसला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Traffic Police : वाहतूक पोलिसांवरील हल्ले वाढले’ ११ महिन्यांत २९ गुन्हे दाखल)

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वपोनि. सतीश गायकवाड, पोलीस निरीक्षक विठ्ठल आर्डेकर, तुकाराम (नाना) कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक यश पालवे आणि पथकाने शुक्रवारी रात्री उपाध्याय नगर झोपडपट्टी येथे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान चंदन कमलेश पासवान याला ताब्यात घेण्यात आले, त्याच्या चौकशीत चंदन हा मिर्झापुर टोळीतील दरोडेखोर असल्याची माहिती समोर आली असून एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कटरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कटरा पोलिसांनी चंदनला अटक करून ट्रान्झिस्ट रिमांडवर त्याला उत्तर प्रदेशात घेऊन गेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.