I.N.D.I Alliance : ‘इंडी’ आघाडीच्या अडचणी वाढणार; मोईत्रा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होणार सादर

208

विरोधकांना घेरण्यासाठी भारतीय जनता पक्ष सज्ज झाला असून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार महुआ मोईत्रा अहवाल पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे ‘इंडी’ आघाडीच्या (I.N.D.I Alliance) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या एथिक्स कमिटीकडून पैसे घेऊन प्रश्न विचाल्याप्रकरणी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ठपका ठेवला असून, त्याबाबतचा अहवाल सोमवारीच लोकसभेत सादर केला जाणार आहे. देशातील चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी, ४ डिसेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या निकालात मतदार कुणाला कौल देणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल. पण मोदी सरकारने मात्र ‘इंडी’ आघाडीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभेच्या एथिक्स कमिटीकडून पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ठपका ठेवला असून, त्याबाबतचा अहवाल सोमवारीच लोकसभेत सादर केला जाणार आहे.

(हेही वाचा Mizoram Results Postponed : ख्रिस्त्यांच्या प्रार्थनेसाठी मिझोरामची मतमोजणी पुढे ढकलली)

‘इंडी’ आघाडीतील (I.N.D.I Alliance) महत्त्वाचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. संसदेसह सभागृहाबाहेरही त्या सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. मात्र, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणात त्या बॅकफूटवर गेल्या आहेत. एथिक्स कमिटीचे अध्यक्ष विनोदकुमार सोनकर हे याबाबतचा अहवाल संसदेच्या पटलावर सादर करणार आहेत. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.